माणगाव तालुक्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्कला २१ गावांतील ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय कृती समितीचा विरोध होत असताना खासदार सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “जनतेचा विरोध असेल तर हा प्रकल्प नकोच,” असं तटकरे यांनी म्हटलं आहे. रायगडमध्ये औद्योगिकीकरण आणि रोजगारनिर्मिती आवश्यक असली तरी पर्यावरण, शेती, पाणी आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.