खालापूर तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारी घटना घडली आहे. कुंभिवली ग्रामपंचायत आणि धामणी गावातील अनेक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसैनिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश खोपोली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, प्रदेश सरचिटणीस शरद कदम आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या घडामोडींमुळे खालापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.