गॅस सिलिंडरचे वाढलेले दर, विजेचे वाढते दर, स्मार्ट मीटरचा आर्थिक भार आणि बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे महिला मजुरांच्या संसाराचे आर्थिक गणित बिघडले आहे. मुलांचे शिक्षण, गणवेश आणि इतर खर्चही वाढले आहेत. बचतगटांच्या माध्यमातून काही प्रमाणात आधार मिळत असला, तरी तो अपुरा ठरत आहे. मनरेगाच्या धर्तीवर शेतात राबणाऱ्या महिला मजुरांसाठी किमान वेतन निश्चित करावे अशी मागणी महिला मजुरांकडून करण्यात येत आहे.