Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Highway Fitness Test : काय सांगता? उद्घाटनापूर्वी महामार्गाची होणार ‘फिटनेस टेस्ट’? सुरुवातीचे 3 महिने प्रवासही होणार फ्री

Highway Fitness Test : रस्ते प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्तम प्रवासाच्या अनुभवासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. नवीन महामार्गाच्या अधिकृत उद्घाटनापूर्वी त्याची कडक 'फिटनेस टेस्ट' केली जाणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 19, 2026 | 11:15 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • उद्घाटनापूर्वी महामार्गाची होणार ‘फिटनेस टेस्ट’?
  • सुरुवातीचे 3 महिने प्रवासही फ्री
  • काय आहे सरकारचा नेमका प्लॅन?
Highway Fitness Test : निवडणूका आल्या किंवा कोणताही शासकीय महत्त्वाचं काम असो नव्याने बांधलेल्या महामार्गांची रस्त्यांची उद्घाटन घाईघाईत उरकली जातात. त्याच्या काही काळातच त्याची दुरावस्था पाहायला मिळते. अलीकडच्या काळात अशा अनेक नव्याने बांधलेल्या महामार्गांवर आणि द्रुतगती मार्गांवर उद्घाटनानंतर लगेचच रस्ते खचल्याच्या, खड्डे पडल्याच्या आणि पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ही अशी दुरावस्था का? असा प्रश्न जनतेच्या, सामान्यांच्या मनात निर्माण होता आहे. याच प्रश्नाच उत्तर म्हणून सरकार आता नवीन योजना आखत आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि यामुळे कोणाला कसा फायदा होईल? ( Highway Fitness Test ) 

Fasting Special Burger Mc D : सांगताय काय? McDonald’s ने आणला उपवासवाला बर्गर… नेमका बनलाय कशापासून?

रस्त्यांची अकाली होणारी झीज, खड्डे आणि इतर दोषांच्या संदर्भात, भारत सरकार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयने आता उद्घाटनापूर्वी २-३ महिन्यांची चाचणी घेण्याची योजना आखत आहे. या कालावधीत कोणताही टोल आकारला जाणार नाही. याचा अर्थ असा की, औपचारिक उद्घाटनापूर्वी रस्त्यांमध्ये असलेले दोष ओळखले जातील आणि त्यामुळे त्या समस्यांचं निराकरण केले जाईल.

सरकारने का घेतला हा निर्णय?

अलीकडेच, लखनौ-कानपूर द्रुतगती मार्ग आणि डेहराडून द्रुतगती मार्ग यांसारख्या अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये उद्घाटनानंतर लगेचच काहीना काही त्रुटी आढळून आल्या. काही ठिकाणी भगदाड पडलं तर काही ठिकाणी पुलचं कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या. हा सगळा प्रकार उद्घाटनानंतर लगेच जनतेला अडचणींचा सामना करावा लागणे आणि त्यानंतर टोल आकारला जाणे हे चुकीचे आहे, असं सरकारचं मत आहे. त्यामुळे, कंत्राटदार आणि सल्लागारांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी, रस्त्याची प्रथम प्रत्यक्ष चाचणी घेतली जाईल. या २-३ महिन्यांच्या चाचणीदरम्यान रस्ते खचल्यास, पाण्याचा निचरा होण्यास अडचण आल्यास किंवा खड्डे पडल्यास, कंत्राटदाराला स्वतःच्या खर्चाने त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे.

टोल द्यावा नाही लागणार

जोपर्यंत महामार्गाची संपूर्ण चाचणी होऊन त्याचे उद्घाटन होत नाही, तोपर्यंत त्या मार्गावर टोल आकारला जाणार नाही. TOI च्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले, “दीर्घकालीन चाचणी घेणे चांगले आहे, कारण त्यामुळे जमिनीचे खचणे, खड्डे किंवा पाण्याचा निचरा होण्यातील समस्या, विशेषतः पावसाळ्यात, ओळखता येतात आणि त्यावर उपाययोजना करता येतात.”

लखनौ-कानपूर द्रुतगती मार्गावरील टोल वसुली स्थगित

हे धोरण गांभीर्याने घेत, सरकारने लखनौ-कानपूर द्रुतगती मार्गावरील टोल वसुली पूर्णपणे स्थगित केली आहे. या मार्गावरील बांधकामातील त्रुटी आणि पावसाळ्यात वारंवार रस्ते खचण्याच्या घटनांनंतर हे पाऊल उचलण्यात आले. आता, द्रुतगती मार्गाची पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत कोणताही टोल आकारला जाणार नाही.

Hallmarking Rules For Gold : विना हॉलमार्क सोने विकल्यास ज्वेलर्सना मोठा फटका! तुरुंगवास की लाखो रुपयांचा दंड? काय सांगतो नियम

Web Title: Highway fitness test new trial run and free toll

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Business News
  • Government Taxes
  • highway
  • highway news
  • Marathi News
  • National Highways
  • Tax Collection

संबंधित बातम्या

NH 48 Encroachment Action Palghar : अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा, 114 अनधिकृत हॉटेल्स अन् ढाब्यांवर हातोडा; प्रशासन ॲक्शन मोडवर
1

NH 48 Encroachment Action Palghar : अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा, 114 अनधिकृत हॉटेल्स अन् ढाब्यांवर हातोडा; प्रशासन ॲक्शन मोडवर

Lagn Aani Barach Kahi: लग्नाच्या पलीकडची गोष्ट! ‘लग्न आणि बरंच काही’मधून उमटणार स्त्रीशक्तीचा नवा आवाज
2

Lagn Aani Barach Kahi: लग्नाच्या पलीकडची गोष्ट! ‘लग्न आणि बरंच काही’मधून उमटणार स्त्रीशक्तीचा नवा आवाज

Fasting Special Burger Mc D : सांगताय काय?  McDonald’s ने आणला उपवासवाला बर्गर… नेमका बनलाय कशापासून?
3

Fasting Special Burger Mc D : सांगताय काय? McDonald’s ने आणला उपवासवाला बर्गर… नेमका बनलाय कशापासून?

Ashish Shelar: Gen Z साठी मराठी सिनेमाचा नवा अंदाज! सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा
4

Ashish Shelar: Gen Z साठी मराठी सिनेमाचा नवा अंदाज! सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.