Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NH 48 Encroachment Action Palghar : अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा, 114 अनधिकृत हॉटेल्स अन् ढाब्यांवर हातोडा; प्रशासन ॲक्शन मोडवर

NH 48 Encroachment Action Palghar : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी आणि शासकीय व वनजमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पालघर जिल्ह्याच्या हद्दीत महामार्गालगत असलेली तब्बल ११४ अनधिकृत हॉटेल्स, ढाबे, टपऱ्या आणि दुकाने आता प्रशासनाच्या रडारवर आली आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 19, 2026 | 08:19 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा
  • 114 अनधिकृत हॉटेल्स अन् ढाब्यांवर हातोडा
  • प्रशासन ॲक्शन मोडवर
NH 48 Encroachment Action Palghar : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या कडेला उभ्या राहिलेल्या अनधिकृत हॉटेल्स, ढाबे, टायर दुकाने, टपऱ्या आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांविरोधात प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महामार्गाची सुरक्षितता, वाहतुकीचा सुरळीत प्रवाह आणि शासकीय व वनजमिनींचे संरक्षण या उद्देशाने तब्बल ११४ अतिक्रमणे प्रशासनाच्या रडारवर आली असून, एनएचएआय, वन विभाग आणि महसूल-पोलिस यंत्रणांच्या समन्वयातून कारवाईला वेग देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्याच्या हद्दीत महामार्गालगत गेल्या काही वर्षांत व्यावसायिक अतिक्रमणांमध्ये मोठी वाढ झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ( NH 48 Encroachment Action Palghar ) 

Palghar Eco Sensitive Zone : वाडा, मोखाड्यातील जमिनींना नव्या पाबंदी? केंद्राचा निर्णय; पालघरमध्ये 126 गावे इको-सेन्सिटिव्ह कक्षेत

महामार्गाच्या हद्दीत व दुभाजकांवर अनधिकृतपणे डेब्रिज टाकणे, रस्त्यालगत दुकाने उभारणे आणि वाहतुकीला ८० अडथळा ठरणाऱ्या व्यावसायिक बांधकामांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर २२ ते ३० जुलैदरम्यान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून अतिक्रमित मालमत्तांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. यापैकी महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणांवर एनएचएआयकडून नियमानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.

नागरिकाच्या आरोपाने प्रकरणाला वेगळे वळण

वनक्षेत्रातील अतिक्रमणांची स्वतंत्रपणे तपासणी करून वन विभागाने संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, महामार्गालगतच्या अतिक्रमणांमधून लोकप्रतिनिधींना आर्थिक वाटा मिळत असल्याचा आरोप करणारे पत्र एका नागरिकाने पालकमंत्र्यांना दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. या पत्राचीही बैठकीत चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई तीव्र केल्याचे सांगण्यात येते.

टप्प्याटप्याने पुढील कारवाई

या सगळ्या कारवाईवर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड़ म्हणाल्या, “अतिक्रमण हटवण्याबरोबरच भविष्यात नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी नियमित पाहणी आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. एनएचएआय, वन विभाग, महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त समन्वयातून टप्प्याटप्याने पुढील कारवाई केली जाणार आहे”.

जमिनीच्या कायदेशीर दर्जानुसार वर्गीकरण

अतिक्रमणांचे जमिनीच्या कायदेशीर दर्जानुसार वर्गीकरण करून पुढील कारवाई केली जात आहे. या कारवाईला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या निर्देशांमुळे अधिक गती मिळाली. वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महामार्गालगतची अनधिकृत बांधकामे आणि डेब्रिज टाकण्याच्या प्रकारांवर आळा घालण्याबाबत संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

Palghar News: चिखलेत समुद्रधूपचा वाढता धोका कायम! नवीखाडी, वडकतीपाडातील किनारा ढासळल्याने उद्भवली स्थिती

Web Title: Nh 48 encroachment action palghar 114 illegal structures to be demolished

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Maharashtra Governement
  • Marathi News
  • National Highways
  • Palghar news

संबंधित बातम्या

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
1

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
2

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
3

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
4

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.