मिरज पूर्व भागात बेकायदेशीरपणे होत असलेल्या मुरूम उत्खननाचे चुकीच्या पद्धतीने पंचनामे होत असल्याबाबत तसच तहसीलदारांच्या खातेनिहाय चौकशी बाबत निवेदन देऊनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ आज भीम प्रतिष्ठानच्या वतीने राज्य उपाध्यक्ष स्वप्निल खांडेकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. दरम्यान मिरज तहसीलदार अपर्णा मोरे- धुमाळ यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, मुरूम उत्खननाची चौकशी व्हावी अन्यथा आगामी काळात महसूल मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही स्वप्नील खांडेकर यांनी दिलाय.