सांगली शहरातील महानगरपालिका शाळा क्रमांक २२ मधील लोकप्रिय शिक्षक निलेश सोनवणे यांच्या अचानक करण्यात आलेल्या प्रशासकीय बदलीविरोधात आज शिक्षक दिनीच पालक आणि विद्यार्थ्यांनी तीव्र आक्रमक पवित्रा घेत सोनवणे यांची शाळा क्रमांक २३ मध्ये झालेली अन्यायकारक बदली तातडीने रद्द करून त्यांना पुन्हा शाळा क्रमांक २२ मध्येच नियुक्त करावे, या जोरदार मागणीसाठी संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्य दरवाज्याला टाळे ठोकून प्रशासनाच्या हुकूमशाही कारभाराचा जळजळीत निषेध केला.
शिक्षक सोनवणे हे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून, त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन शैलीमुळे विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला आहे. अशातच शिक्षक दिनासारख्या पवित्र दिवशी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ खेळला जात असल्याचा संताप पालकांनी व्यक्त केला. “जोपर्यंत बदली रद्द होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेत पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतून परत घरी नेले. या संतप्त आंदोलनामुळे काही काळ शाळा परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनावर आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष अरुण आठवले यांनी स्पष्ट इशारा दिला की, निलेश सोनवणे यांची बदली लवकरात लवकर रद्द न केल्यास प्रशासनाविरोधात आणखी तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल. विद्यार्थिनी श्रीश्या मयूर आठवले हिने देखील सरांच्या उत्तम शिकवण्याबद्दल सांगत त्यांना याच शाळेत कायम ठेवण्याची आर्त हाक दिली. तसेच, पालक संगीता कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बळी देणाऱ्या या मनमानी निर्णयाचा तीव्र शब्द निषेध केला.