Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या 'मुक्तांगण' शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. मुक्तांगण शाळेत यंदाही दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 05, 2026 | 01:23 PM
Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

Follow Us
Follow Us:
  • दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मानवी मनोरे रचत उत्साहात दहीहंडी फोडली.
  • गोविंदा गीतांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला.
  • विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
महाड: सण-उत्सवांचा आनंद प्रत्येकाच्या वाट्याला यावा आणि प्रत्येकाला आपल्या संस्कृतीशी जोडले जाणारे हे क्षण मनमुराद अनुभवता यावेत, या भावनेतून महाड शहरातील नवेनगर येथील हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या ‘मुक्तांगण’ शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ४ सप्टेंबर रोजी शुक्रवार जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गोविंदा गीतांवर ठेका धरत दहीहंडीचा मनसोक्त आनंद लुटला. या उत्सवात या मुलांसह संस्थेचे महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.

Vasai Virar Garbage Scam : 957 कोटींच्या कचरा कंत्राटाचा फैसला आता नगरसेवकांच्या हाती! दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्तुत्य उपक्रम

हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक व समाजसेवक किशोर धारिया यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा तसेच इतर मुलांप्रमाणेच त्यांनाही सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून मुक्तांगण शाळेत यंदाही दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

गोविंदागीतांच्या तालावरती विद्यार्थ्यांनी केले नृत्य

शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी खास दहीहंडी बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण होते, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्याथ्यांनी एकमेकांना साथ देत मनोरे रचले आणि अखेर दहीहंडी फोडण्याचा आनंद अनुभवला. दहीहंडी फुटताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. गोविंदा गीतांचा ताल सुरू होताच विद्यार्थ्यांनी नृत्य करत आनंद व्यक्त्त केला.

पारंपरिक दहीहंडीचा जल्लोष

काही क्षणांसाठी शाळेचे प्रांगण पारंपरिक दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषाने भारून गेले. योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ही मुलेही प्रत्येक आनंदाचा क्षण तितक्याच उत्साहाने साजरा करू शकतात, याचा प्रत्यय या उपक्रमातून आला. मुक्तांगण शाळेत अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनाची संधी मिळत नाही, तर त्यांच्यातील सामाजिक सहभाग, आत्मविश्वास आणि एकमेकांशी संवाद साधण्याची भावना अधिक दृढ होते. त्यामुळे सण-उत्सवांच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या आनंदासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार

चेहऱ्यावर समाधान

या प्रसंगी मुक्तांगणच्या प्रिन्सिपल मंजुषा साबळे यांच्यासह श्रद्धा चोरगे, मयुरी कळमकर, ऐश्वर्या गायकवाड, सुयोग शिंदे, शैलजा घोटाळकर आणि अंकिता मोरे उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत या आनंदसोहळ्यात सहभाग घेतला. गोविदा गीतांवर धरलेला ताल आणि त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले निरागस हास्य यामुळे मुक्तांगणच्या प्रांगणात रंगलेला यंदाचा दहीहंडी उत्सव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान देऊन गेला.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mahad dahi handi divyang students celebrate janmashtami with joy build human pyramid and break dahi handi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Sunny Leone: सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! मराठमोळ्या अंदाजात भन्नाट जलवा
1

Sunny Leone: सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! मराठमोळ्या अंदाजात भन्नाट जलवा

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती
2

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

Janhvi Killekar on Bigg Boss Marathi 5: ‘मला खरंच भांडता येत नाही, म्हणून…’  बिग बॉस मराठीबाबत जान्हवी किल्लेकरचा मोठा खुलासा
3

Janhvi Killekar on Bigg Boss Marathi 5: ‘मला खरंच भांडता येत नाही, म्हणून…’ बिग बॉस मराठीबाबत जान्हवी किल्लेकरचा मोठा खुलासा

Irene Rudakova Video: रिक्षाचालकाला शिवीगाळ अन् अरेरावी! कारवाल्याचा संतापजनक प्रकार बिग बॉस मराठी फेम इरीनाने केला उघड
4

Irene Rudakova Video: रिक्षाचालकाला शिवीगाळ अन् अरेरावी! कारवाल्याचा संतापजनक प्रकार बिग बॉस मराठी फेम इरीनाने केला उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.