Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?

शुक्रवारी शाळेत आयोजित करण्यात आलेले संमेलन एक दिवस आधी केंद्रप्रमुखांकडून रद्द करण्यात आले. विद्यार्थ्यांना व पालकांना वेळेत ही माहिती मिळाली नव्हती, त्यामुळे ४० पेक्षा जास्त विद्यार्थी शाळेत दाखल झाले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 05, 2026 | 02:17 PM
Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • शिक्षक संमेलन रद्द झाल्याची माहिती काही विद्यार्थ्यांना न मिळाल्याने ते सकाळच्या सत्रासाठी शाळेत पोहोचले.
  • सकाळी सुमारे ९ वाजता शिक्षक शाळेत दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करून १० वाजता नियमित कामकाज सुरू करण्यात आले.
  • सुपगावनंतर गोंडपिपरीतही अशी घटना घडल्याने शिक्षक उपस्थिती आणि शिक्षण विभागाच्या प्रशासकीय समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.’
गोंडपिपरी: गोंडपिपरी येथील जिल्हा परिषद मुलींची प्राथमिक शाळा येथे शिक्षक संमेलनाच्या आयोजनामुळे निर्माण झालेल्या गैरसमजमुळे विद्यार्थ्यांना शाळेत येऊनही काही काळ शिक्षकांविना थांबण्याची वेळ आली. या प्रकारामुळे शुक्रवारी पालकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याआधीही गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथे शाळेत विद्यार्थी पोहचले मात्र शिक्षक गैरहजर राहण्याचा असाच प्रकार उघडीस आला होता. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

शुक्रवारी शाळेत शिक्षक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे त्या दिवशी शाळा सकाळच्या वेळेत सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, संमेलनाच्या एक दिवस आधी केंद्रप्रमुखांकडून शिक्षक संमेलन रद्द करण्यात आले. ही माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना वेळेत मिळाली नसल्याने सकाळच्या सत्रातील शाळेसाठी सुमारे ४० पेक्षा जास्त विद्यार्थी शाळेत दाखल झाले. शाळेत सकाळच्या वेळेत शालेय पोषण आहार सुद्धा तयार करण्यात आले. मात्र त्यावेळी शाळेत एकही शिक्षक उपस्थित नव्हते त्यामुळे पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तसेच संबंधित शिक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शिक्षक अनुपस्थित असल्याने विद्यार्थ्यांच्या झालेल्या गैरसोयीमुळे पालकांचा गोधळ निर्माण झाला.  (फोटो सौजन्य – AI Created) 

दरम्यान, सकाळी सुमारे ९ वाजता शिक्षक शाळेत दाखल झाले. जे विध्यार्थी सकाळी आले त्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. पुढे नियमित वेळेनुसार सकाळी १० वाजता शाळेचे कामकाज सुरळीतपणे सुरू करण्यात आले. काही दिवसांपूर्वी गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चारही शिक्षक अनुपस्थित असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांविना शाळेत यावे लागले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांची चौकशी सुरू केली.

या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच पुन्हा गोंडपिपरीतील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत शिक्षकांच्या अनुपस्थितीचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकाच तालुक्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शाळांमधील शिक्षक उपस्थिती, प्रशासकीय समन्वय आणि शिक्षण विभागाच्च्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संमेलन रद्द झाल्याची माहिती वेळेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असती, तर हा प्रकार टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त करण्यात आली.

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचा अतिरिक्त भार होणार आता कमी; शिक्षण विभागाकडून कडक सूचना जारी

शिक्षक संमेलन रद्द झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. परंतु काही विद्यार्थी लवकर घरी गेल्याने काही विद्यार्थ्यांना माहिती मिळाली नाही. ते सकाळी शाळेत आले. -अंकुश कुळमेथे, मुख्याध्यापक, जि.प. मुलींची शाळा, गोंडपिपरी

काही विद्यार्थ्यांचा गैरसमज झाल्याने ते शाळेत आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. सोमवारी मी स्वतः शाळेला भेट देऊन संपूर्ण वस्तुस्थितीची चौकशी करणार असून, त्यानंतर योग्य ती कार्यवाही करणार – वैभव खांडरे, विस्तार अधिकारी (शिक्षण), पंचायत समिती, गोंडपिपरी

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Gondpipari school news more than 40 students reach school but no teachers present parents raise questions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
1

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
2

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

Sunny Leone: सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! मराठमोळ्या अंदाजात भन्नाट जलवा
4

Sunny Leone: सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! मराठमोळ्या अंदाजात भन्नाट जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.