सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयात एका विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर बसून तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रशासकीय व समितीच्या दबावामुळेच विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी जबाबदार प्राचार्य व चौकशी समितीवर तात्काळ निलंबन आणि फौजदारी कारवाई करण्यात यावी. अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे. तसेच मृत विद्यार्थिनीच्या पालकांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली आहे.