Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारचा मोठा निर्णय; राज्यभर ‘चला शाळेत जाऊ’ अभियान, प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती

राज्यातील शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून ‘चला शाळेत जाऊ’ अभियान राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2026 | 03:00 PM
सरकारचा मोठा निर्णय; राज्यभर ‘चला शाळेत जाऊ’ अभियान, प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती

सरकारचा मोठा निर्णय; राज्यभर ‘चला शाळेत जाऊ’ अभियान, प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती

Follow Us
Follow Us:
  • राज्यभर ‘चला शाळेत जाऊ’ अभियान राबवणार.
  • प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती.
  • शाळांमध्ये शिक्षण, स्वच्छता, पाणी आणि भौतिक सुविधांवर विशेष भर.
शाळांचा आणि शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर ‘चला शाळेत जाऊ’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच शाळांमधील भौतिक सुविधा, कला, क्रीडा आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कारवृद्धी यांना या अभियानातून प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शाळांमध्ये आवश्यक असलेल्या विविध सुविधांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून निधीची पूर्तता केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस

या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शाळांना भेटी देऊन समस्या जाणून घेतील. पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, शिक्षण विभागाने प्रशासकीय कामकाजाबरोबरच विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि ग्रामस्थ यांच्याशी थेट संवाद साधला पाहिजे. राज्यातील आठही विभागामध्ये वरिष्ठ अधिका-याची जिल्हानिहाय जबाबदारी निश्वित करून प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेण्यात येणार आहे. हे अधिकारी चार दिवसांच्या विशेष दौन्यात शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यांकन करतील. ज्या शाळांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील त्या शाळांना विविध माध्यमांतून प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी विद्यार्थी संघाची घेणार मदत : दादा भुसे

प्रत्येक शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करण्यात आला आहे. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे ज्ञान, अनुभव आणि योगदान यांचा उपयोग करून घेण्यावरही भर दिला जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने हे अभियान राबविले जात असल्याचेही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

Wardha News : आश्रमशाळेत क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी, ६० टक्केच हजेरी; अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी नसल्याची ओरड

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, “शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वछतागृहे, सुरक्षित इमारती आणि स्वच्छ परिसर यांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. काही कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असली तरी अनेक सुधारणा लोकसहभागातून आणि स्थानिक पातळीवरील पुढाकारातून तातडीने करता येऊ शकतात. शाळांची रंगरंगोटी, स्वच्छता आणि परिसर सुशोभीकरणासाठी समाजाचा सहभाग घ्यावा”.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

 

Web Title: Chala shalet jau abhiyan shikshan palak senior officer maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • dada bhuse
  • education
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या
1

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या

Khalapur : तटकरेंच्या मध्यस्थीला यश; खालापूरचा महाएल्गार आंदोलन तूर्तास स्थगित
2

Khalapur : तटकरेंच्या मध्यस्थीला यश; खालापूरचा महाएल्गार आंदोलन तूर्तास स्थगित

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय
3

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय

‘… या गोष्टींना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे’; मंत्री Dada Bhuse यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4

‘… या गोष्टींना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे’; मंत्री Dada Bhuse यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.