Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू

स्ट्रोकच्या उपचारात वेळेला मोठे महत्त्व असल्याने मुंबईतील ट्रॉमा रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांपासून बंद असलेली न्युरोइंटरव्हेन्शन सेवा पुन्हा सुरू करण्यात येत असून, अत्याधुनिक यंत्रणेचा अधिक प्रभावी वापर केला जाणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2026 | 10:54 AM
२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू

Follow Us
Follow Us:
  • २५ कोटींच्या डीएसए यंत्राचा पूर्ण क्षमतेने वापर
  • तीन वर्षांपासून बंद असलेली न्युरोइंटरव्हेन्शन सेवा पुन्हा सुरू
  • स्ट्रोकसह मेंदूच्या रक्तवाहिन्यांवरील उपचारांना मिळणार वेग
स्ट्रोकच्या उपचारात प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असल्याने जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात बंद पडलेली न्यूरोइंटरव्हेन्शन सेवा पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली आणि एकेकाळी ‘फ्रायडे ओपीडी’ म्हणून प्रसिद्ध असलेली विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

Breastfeeding: पूर्वीच्या तुलनेत आता स्तनपान अधिक आव्हानात्मक का वाटतेय? ‘या’ कारणांमुळे वाढू शकतात अडचणी

विशेष म्हणजे, तब्बल २५ कोटी रुपयांचे अत्याधुनिक डीएसए म्हणजे डिजिटल सबस्ट्रॅकशन अँजिओग्राफी यंत्र उपलब्ध असूनही त्याचा अपेक्षित वापर होत नव्हता. आता या यंत्राचा पूर्ण क्षमतेने वापर करून स्ट्रोक आणि मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या आजारांवरील उपचारांना गती देण्याचे नियोजन अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांच्या मार्गदर्शनाने होत आहे. दर शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सुरुवातीच्या ओपीडीत न्यूरोव्हॅस्क्युलर इंटरव्हेन्शनचे तज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी व उपचारांचे नियोजन केले जाणार आहे.

बंगळूरू आणि ट्रॉमा रुग्णालयात डीएसए यंत्रणा

डीएसए हे अत्याधुनिक मॉड्युलर यंत्र असून त्यात इन-बिल्ट सीटी स्कॅनची सुविधाही आहे. भारतात अशा स्वरूपाची यंत्रणा मोजक्या ठिकाणी असून बंगळुरूनंतर ट्रॉमा रुग्णालयातील यंत्रणा महत्त्वाची मानली जाते. मेंदूतील रक्तवाहिन्यांचे फुगवटे, तीव्र स्ट्रोक आणि अन्य न्यूरोव्हॅस्क्युलर आजारांच्या निदानासह मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी, कॉइलिंग, एम्बोलायझेशन यांसारख्या उपचारांचे नियोजन यामुळे अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निरंजन क्षीरसागर यांनी म्हटले, “66 गेल्या तीन वर्षांपासून ही ओपीडी बंद होती, ‘फ्रायडे ओपीडी’ म्हणून तिची ओळख होती आणि आठवड्यातून एकदाच सुरू असतानाही सुमारे १५० रुग्ण येत होते. आता तीन न्यूरोसर्जनव्या माध्यमातून सोमवार ते शनिवार ओपीडी सुरू करण्याचे, तर रविवार शस्त्रक्रियांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे. या महिन्यात सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा आणि पूर्वर्वीपेक्षा अधिक रुग्णाना उपचार देण्याचा आमचा प्रयत्न आहे”.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Trauma hospital neurointervention service dsa machine stroke treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • Hospital
  • lifestyle news
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

सरकारचा मोठा निर्णय; राज्यभर ‘चला शाळेत जाऊ’ अभियान, प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती
1

सरकारचा मोठा निर्णय; राज्यभर ‘चला शाळेत जाऊ’ अभियान, प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती

Khalapur : तटकरेंच्या मध्यस्थीला यश; खालापूरचा महाएल्गार आंदोलन तूर्तास स्थगित
2

Khalapur : तटकरेंच्या मध्यस्थीला यश; खालापूरचा महाएल्गार आंदोलन तूर्तास स्थगित

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी
3

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी

एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे साध्या लोकलची कोंडी; प्रवाशांना फटका, मध्य रेल्वेची चिंता वाढली
4

एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे साध्या लोकलची कोंडी; प्रवाशांना फटका, मध्य रेल्वेची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.