लातूरमध्ये सूरज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यां कडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छावा संघटनेने जोरदार निदर्शने केली.आज सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात छावा कार्यकर्ते एकवटले होते. ‘सूरज चव्हाण हाय हाय’ सुरज चव्हाणचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाण यांच्यावर रोष व्यक्त केला. काही कार्यकर्त्यांनी पत्ते फेकून निषेध नोंदवला.यावेळी संघटनेने स्पष्ट इशारा दिला की, “जर सूरज चव्हाण यांना पक्षातून त्वरित निलंबित करण्यात आले नाही, तर छावा संघटना त्यांना दिसेल तिथे काळे फासून निषेध नोंदवेल, आणि दुसऱ्या दिवशी दिलगिरी व्यक्त करूनही आम्ही शांत बसणार नाही,” अशी तिव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.