देशाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पालघरच्या वाढवण येथे होऊ घातलेल्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात चार कंटेनर टर्मिनल तयार करण्यात येणार असल्याची माहिती जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे . आज जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली . पहिल्या टप्प्यात चार तर दुसऱ्या टप्प्यात पाच टर्मिनस तयार केले जाणार असून पहिल्याच टप्प्यात बऱ्यापैकी काम झालेलं असेल असा विश्वास देखील यावेळी बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी व्यक्त केला . वाढवण बंदर येथे 70 टक्के स्थानिकांनाच रोजगार दिला जाणार असून येथे लागणाऱ्या ट्रक आणि कामगारांसाठी स्थानिक सोसायटी यांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे देखील यावेळी वाघ म्हणाले. तर जवळपास सध्या 2000 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार असून आत्ता प्रशिक्षणाला ही सुरुवात झाली आहे त्यामुळे स्थानिकांना रोजगारात पहिलं प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मत ही यावेळी उमेश वाघ यांनी व्यक्त केलं आहे.