आरटीओ विभागाच्या माध्यमातून अनेक मालवाहतूक गाड्यांसह इतर गाड्यांवर कारवाई होत असते परंतु या कारवाईमध्ये पारदर्शकता यावी यासाठी आरटीओच्या गाड्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे असतानाही या गाड्यांवर ते कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी स्वतः कॅमेऱ्यासह आरटीओंना निवेदन दिले. दरम्यान असे सीसीटीव्ही कॅमेरे राष्ट्रीय विकास सेनेच्या वतीने आरटीओ विभागाला भेट देण्याची ग्वाही दिली. परंतु आरटीओने सदर कॅमेरा स्वीकारला नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा करून या संदर्भात निर्णय घेऊ अशा तऱ्हेचे आश्वासन आरटीओकडून देण्यात आले आहे. एक महिन्यापर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतरही आरटीओ गाड्यांवर कॅमेरे बसवले गेले नाहीत तर आम्ही स्वतः ते बसू अशातऱ्हेचा इशारा सुधाकर गायकवाड यांनी दिलाय.