ठाण्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत सर्वपक्षीय विरोधी नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. बाळू (प्रदीप) पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील वाढती गुन्हेगारी, ड्रग्जची समस्या आणि शहरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाविरोधात जितेंद्र आव्हाड, राजन विचारे आणि केदार दिघे यांनी ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता भव्य ‘भयमुक्त ठाणे’ मोर्चाची घोषणा केली आहे. या मोर्चात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.