कासारवडवली उड्डाणपूलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून, आज ठाणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले. मंत्री सरनाईक म्हणाले की, लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर, गायमुख, कासारवडवली परिसरात उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो. तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला आर्थिक निधी मंजूर केला. त्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करणे शक्य झाले आहे. या प्रकल्पामुळे ठाणे – बोरीवली – वसई – जेएनपीटी – गुजरात दरम्यानची वाहतूक आता अधिक सुलभ होणार असून, गायमुख ते वाघबिळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.