पनवेल परिसरातील मंजुश्री पटवर्धन युनिक सोल्युशन हे कस्टम चे गोडाऊन फोडून येथे चोरी करण्यात आली होती. या गोडाऊन परिसरात सिक्युरिटी गार्ड असून देखील ही चोरी झाली होती. 24 डिसेंबरला चोरी झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पनवेल पोलिसांनी चोरीचा त्या दिशेने तपास केला व अवघ्या 48 तासात चोरीला गेलेला माल हस्तगत केला. यामध्ये सुपारी व मिरी असे पदार्थ होते. तब्बल 1 कोटी 80 लाखाचा माल या गोडाऊन मध्ये होताआतापर्यंत या गोडाऊनमध्ये तब्बल तीन वेळा चोरी झाली आहे मात्र पोलिसांच्या सतर्कतेने हा माल हस्तगत केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.