उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलंय. अख्ख आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करणाऱ्या शिरीष महाराजांसाठी शिंदेंनी हे पाऊल उचललं. आमदार विजय शिवतारेंनी महाराजांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना शिंदेंनी पाठवलेली 32 लाखांची रक्कम देऊ केली. पाच फेब्रुवारीला देहूतील राहत्या घरी शिरीष महाराजांनी गळफास घेत आत्महत्या केली अन वारकरी संप्रदयात शोककळा पसरली. ही बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजली अन त्यांनी ही याबाबत दुःख व्यक्त केलं. ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली, ते कर्जाचं ओझं आज स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंनी उतरवलं.