(फोटो सौजन्य: Instagram)
धर्तीवरील स्वर्गच जणू…! चीनमधील हा विशाल तेजमय दरवाजा पाहून डोळेच दिपतील; Video Viral
काय आहे प्रकरण?
सांगितलं जात आहे की, ४४ वर्षांच्या कीनो बटलरचा त्याच्या गर्लफ्रेंडकडून मृत्यू झाला. कीनोचे वजन अंदाजे ५४ किलोग्रॅम होते तर त्याची गर्लफ्रेंड विंडी थॉमसचे वजन 136 किलो होते. ते दोघेही एका घरात राहत होते. १८ मार्च २०१८ रोजी, त्या दोघांमधील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गर्लफ्रेंड विंडी रागाच्या भरात तिचा बॉयफ्रेंड कीनोवर धावून गेली. तिच्या प्रचंड वजनामुळे कीनोचा श्वास गुदमरू लागला. त्याच्या छातीवर आणि मानेवर इतका दाब आला होता की त्याला श्वास घेता येत नव्हता. विंडीच्या वजनामुळे त्याचा श्वास थांबला ज्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. इथे डॉक्टरांनी त्याला कीनोला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण ‘छाती आणि मानेवर दाब आल्यामुळे श्वसनक्रिया बंद पडणे’ असे सांगण्यात आले.
पुढे या प्रकरणाला हत्या ठरवत गर्लफ्रेंड विंडी थॉमसवर ‘थर्ड डिग्री मर्डर’चा आरोप ठेवण्यात आला. न्यायालयात प्रदीर्घ काळापर्यंत खटला सुरु असताना अखेर विंडीने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर न्यायलयाकडून विंडीला १८ ते ३५ वयापर्यंतची शिक्षा ठोठावण्यात आली. जोडप्याच्या वजनातील फरकामुळे घडलेली ही घटना सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत राहिली. अलिकडे याची एक शाॅर्ट क्लिप सोशल मिडियावर शेअर ककण्यात आलूी आहे जी पाहून यूजर्सचा थरकाप उडाला. एकाने लिहले, “जास्त वजन धोकादायक असते” तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, “भावाला तिचे वजन सांभाळता आले नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






