(फोटो सौजन्य: X)
धर्तीवरील स्वर्गच जणू…! चीनमधील हा विशाल तेजमय दरवाजा पाहून डोळेच दिपतील; Video Viral
व्हिडिओमध्ये तरुण पहिल्यांदाच क्लिन शेव करुन कुटुंबाच्या आणि मित्रांच्या प्रतिक्रिया लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. तरुणाचा क्लिन शेविंग लूक पाहून सुरुवातील बहिण आणि मित्र तर खूप थक्क होतात. तरुणाला नव्या रुपात पाहून त्यांना हसू अनावर होतं पण खरा ट्विस्ट वडिलांच्या प्रतुिक्रियेत दिसून येतो. आपल्या वडिलांना नवा लूक दाखवण्यासाठी तरुण त्यांच्याजवळ जातो आणि इथूनच ड्रामा सुरु होतो.
व्हिडिओत आपण पाहू शकता यात तरुण दरवाजवळ उभा राहून कॅमेरा ऑन करत असतो. यावेळी मागून वडिल येतात आणि त्याला विचारतात की, तू दाढी कापलीस ना. यावर मुलगा उत्तर देण्यासाठी मागे वळतो आणि त्याला विना दाढीत पाहून वडिल नाराज होतात. मुलाने क्लिन शेविंग केली आहे हे पाहून वडिलांना इतका राग येतो की ते तरुणाचा चेहरा पाहताच त्याला कानशिलात बडवू लागतात. नंतर ते त्याला बोलतात की, तू माझं कधीच ऐकत नाही. मुलगा यावर काहीच उत्तर देत नाही आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.
Old-Kalesh b/w Son and Dad over Clean-Shaving💀 pic.twitter.com/OxrXgcOTuY — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 17, 2026
तरुणाचा प्लॅन सपशेल फेल झाला आणि बदल्यात त्याला वडिलांचा मार देखील खावा लागला हे पाहून यूजर्स आता व्हिडिओवर मजेदार आणि हास्यास्पद प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप दिवसांनी ‘क्लीन शेव्ह’ करणे म्हणजे ‘देसी’ वडिलांकडून दोन कडक थोबाडीत खाण्याचे उघड निमंत्रणच आहे. “कुळाची अब्रू घालवली!” ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वडिलांनी त्याला मारलं कशाला, त्याने फक्त दाढीच तर काढली होती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पण बाबांनी स्वतः तर क्लीन-शेव्ह केली आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






