PHOTO GENRATE AI
जत्रेत ‘ग्रॅव्हिटी स्विंग’ (झोपाळा) तुटला. अपघाताच्या वेळी या झोपाळ्यावर 20-30 मुले होती. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व मुले सुरक्षित आहेत. असे सांगण्यात येते. या झोपाळ्याला अधिकृत परवानगी होती. या झोपाळ्याच्या सुरक्षिततेची तपासणी केली होती का, की त्याची स्थिती न तपासताच ‘एनओसी’ (NOC) देण्यात आली होती. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक लोकांच्या मते, पाळण्याच्या डब्याचं सीट लॉक नीट लागले नव्हते किंवा फिरताना डबाच तुटला असावा. मात्र, प्रशासनाकडून किंवा तपास यंत्रणांकडून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
#UttarPradesh: In #Kanpur, the gravity swing broke at the #Dussehra fair. At the time of the accident, 20-30 children were on the swing. According to the police, everyone is safe. It is also being said that the swing had permission. After the swing broke, questions are bound to arise: Was the swing’s fitness checked, or was the NOC issued without inspecting its condition? — Siraj Noorani (@sirajnoorani) October 23, 2026
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार काही लोक किरकोळ जखमी झाले असून कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. अशी माहिती समोर येत आहे. जत्रे दरम्यान हा पाळणा वेगात सुरू होता. हा अपघात झाल्याने जत्रेत एकच खळबळ उडाली आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन गर्दीला शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
सदर घटनेचा संपूर्ण थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. जत्रेतील मनोरंजनात्मक राईड्सच्या सुरक्षिततेवर आणि देखभालीवर आता मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.






