सिंहाच्या शावकाचा गर्जना करतानाचा मनमोहक व्हिडिओ
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा आश्चर्यात पाडणारे व्हिडिओ आपण पाहतो तर कधी मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो खूप मनमोहक आहे. हा व्हिडिओ सिंहाच्या शावकाचा आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांची मने जिंकली आहेत.
वास्तविक हा व्हिडिओ टांझानियातील जंगल सफारीचा आहे. हा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. त्यांच्या सफारीदरम्यान त्यांनी पाहिलेल्या सिंहाचा आणि त्याच्या शावकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस पडत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केलेला आहे. अनेकांनी या व्हिडिओचे कौतुक केले आहे तर काहींनी म्हटले आहे की, त्यांना त्रास देऊ नका.
छोटेसे पिल्लू डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करते
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गाडी जंगल सफारीदरम्यान थांबलेली दिसत आहे. तिथेच एक सिंहणी जाताना दिसत आहे. तर त्या सिंहीणीच्या पुढे तिचे छोटेस पिल्लू पळताना दिसत आहे. काहीजण हे दृश्य टिपताना त्याचा आनंद घेताना दिसत आहेत. लहान सिंहाचे पिल्लू वाटेवरून चालत असून सिंहीण त्याच्या मागे जात आहे. थोड्यावेळाने ते छोटेसे पिल्लू गर्जना करण्याचा प्रयत्न करते. या दृश्याने पर्यटक आनंदी झाले आहेत. हे दृश्य इतके मनमोहक आहे की, या व्हिडिओने सोशल मीडियावरली युजर्सचीही मने जिंकली आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर the.experience.media या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, टांझानियाच्या मध्यभागी, एक मनमोहक क्षण कॅमेरात कैद, एक सिंहीण आणि तिचे शावक गाडीजवळ आले आणि सिंहाच्या पिल्लाने आपल्या डरकाळी फोडण्याचा प्रयत्न केला, सर्वांचे मनोरंजन केले. तर सोशल मीडियावर देखील या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रीया आल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आई, मी मोठा भयानक सिंह आहे का?, हो बाळा, तू त्या माणसांना घाबरवलेस” असे सिंहिणी आणि शावकाचे बोलत असतील असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्या छोटूला त्रास देऊ नका.
हे देखील वाचा- विचित्र! मेट्रोत अळीसारखा सरपटू लागला तरूण; पाहून लोक घाबरले, व्हिडिओ व्हायरल