फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियैवर आपल्याला असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेक चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियावर व्हयूज मिळवण्यासाठी, फेमस होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका तरूणाने मेट्रोमध्ये विचित्र वागायला सुरूवात केले. ते पाहून मेट्रोतील लोक घाबरले आहेत तर नेटकऱ्यांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे.
तुम्ही मेट्रोचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कधी डान्स करतानाचे, तर कधी योगा करतानाचे. अनेकदा भांडणाचे व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अनेकदा असेही व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यामध्ये काही लोक आनंदाने आपला कामाचा ताण कमी करण्यासाठी गाणी म्हणत आहेत. मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही वेगळाच आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ परदेशातील आहे.
हे देखील वाचा – गजब! गाडीला नाही तर हेल्मेटला इंडिकेटर आणि हेडलाईट; व्हिडिओ पाहून लोक हैराण
अळीसारखा सरपटू लागला तरूण
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्या तुम्ही पाहू शकता की, मेट्रोमध्ये लोकांची गर्दी आहे. काही लोकांना बसायला जागा मिळालेली नाही त्यामुळे ते उभे आहेत. याच वेळी मेट्रोमध्ये एक व्यक्ती जमिनीवर पडलेली दिसत आहे. ती व्यक्ती अचानक अळीसारखे रेंगाळायला लागते. त्यामुळे तेकील काही लोक घाबरतात. नंतर ती व्यक्ती उठून अचानक विचित्र वागायला लागते. हे पाहून मेट्रोतील काही लोक त्याच्यापासून लांब जातात. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याच्या अंगात भूत शिरल्याचे म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओ
“रील रोग” से केवल भारत ही पीड़ित नहीं है 😁 pic.twitter.com/bUexBQf2qj
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) October 5, 2024
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफऑर्म एक्सवर @sanjayjourno या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रील रोग फक्त भारतातच नाही सगळीकडे परला आहे असे लिहिले आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, त्याच्या अंगात बहुतेक अळी शिरली असेल, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, कांकांनी बहुतेक अळी खाल्ली, आणखी एका युजरने म्हटले आहे की, खरेच लोकांना अलीकडे गंभीर आजार झाला आहे तो म्हणजे रील रोग. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.