फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सध्या इंटरनेटच्या जगात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा हैराण करणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ समोर येतात. सध्या सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. अनेकदा आपल्याला असे व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरूण वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका मारताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. तर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांनी या तरूणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तामधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तरूणाच्या साहसाचे कौतुक केले आहे तर बरेच जण संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
हे देखील वाचा – विचित्र! मेट्रोत अळीसारखा सरपटू लागला तरूण; पाहून लोक घाबरले, व्हिडिओ व्हायरल
वाघाच्या पाठीवर बसून बिनधास्त फिरताना तरूण
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूण वाघाच्या पाठीवर बसलेला दिसत आहे. वाघाच्या गळ्यामध्ये एक साखळी बांधलेली दिसत आहे. धक्कादायक म्हणजे ती व्यक्ती बिनधास्तपणे वाघाच्या पाठीवर स्वार असल्याचे पाहायला मिळत आहे. वाघाला साखळीने बांधलेले असूनथोडे अंतर चालल्यानंतर वाघ एक पिंजऱ्याजळ जातो. त्या पिंजऱ्यामध्ये एक सिंह आणि सिंहिणीला कैद केले दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आवाक् झालेले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकरी संतापले म्हणाले…
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @nouman.hassan1 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केला आहे. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एक युजरने यावर प्रतिक्रीया देत म्हटले आहे की, विदेशी प्राणी आणि विशेषतः वाघांना पाळीव प्राणी म्हणून ठेवण्याचा ट्रेंड पाकिस्तानमध्ये वेगाने वाढत आहे. तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, वाघ हा जंगली आणि धोकादायक प्राणी आहे, त्याला अशा प्रकारे बांधून पाळीव प्राणी बनवणे चुकीचे आहे, एक दिवस याला हे महागात पडेल, तर आणखी एका युजरने म्हटले आहे ती, असे व्हिडिओ बनवून समाजात चुकीचा संदेश पसरवण्याचे काम चालू आहे.
हे देखील वाचा – गजब! गाडीला नाही तर हेल्मेटला इंडिकेटर आणि हेडलाईट; व्हिडिओ पाहून लोक हैराण