वय फक्त एक नंबर, 'कजरा रे' गाण्यावर थिरकली आज्जीची कंबर; असा डान्स की तरुणांनाही आणेल लाज; Video Viral
वय हे फक्त एक नंबर आहे, आपल्यात जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो. हे ब्रीदवाक्य तर तुम्ही अनेकदा ऐकले असेल. याचेच जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे. यात एक आज्जी अभिनेत्री ऐश्वर्या रॉयच्या कजरा रे गाण्यावर थिरकताना दिसून आली. व्हिडिओत आजीचे ठुमके इतके जबरदस्त असतात की लोक त्याने भारावून जातात आणि ऐश्वर्याही यापुढे फिकी उपमा आजींना देऊ लागतात. चला व्हिडिओत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका मेहंदी फंक्शनचा आहे. मेहंदी कार्यक्रमात सर्वजण आनंदाने मजा लुटत असतात मात्र लक्षवेधी ठरला तो म्हणजे आजीचा डान्स. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात ‘बंटी और बबली’ चित्रपटातील कजरा रे गाणं सुरु असतं आणि यात सर्वजण आनंदाने नाचत असतात. मात्र यात आजीचा डान्स सर्वांचे मन जिंकतो. आजी एकही स्टेप मिस करत नाही आणि आपल्या अनोख्या अंदाजात धम्माल डान्स करू लागते. यावेळी घरचे इतरही सदस्य डान्स करत असतात मात्र लाइमलाइट येते ती फक्त आजीच्या नृत्यावर. आजही हे गाणं वाजलं की सर्वांना अभिनेत्री ऐश्वर्या रायची आठवण येते मात्र आजीच्या या डान्सने तर ऐश्वर्या रायलाही टक्कर दिली आहे. त्यांचा उत्साहवर्धक डान्स तरुणाईला लाजवेल असा आहे. डान्सच काय तर आजीचे हावभाव देखील इतके अफलातून आहेत की सर्वांच्या नजर यावर खिळून राहिल्या. लोकांनी हा व्हिडिओ अक्षरशः डोक्यावर नाचवला आणि याला मोठ्या प्रमाणात याला शेअर केले.
हा व्हायरल व्हिडिओ @3dt_dance_crew_pune नावाच्या इंस्टाग्राम अकाउटंवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘अज्जी ची कमाल’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी व्हिडिओला लाइक्स देत यावर आपली पसंती दर्शवली आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आजीच्या नृत्यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मला खूप आनंद होत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजीने मन जिंकले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.