Ahmedabad Plane Crash viral video A mother tryies to protecting son after Air India plane crashed in Ahmedabad
Ahmedabad Plane Crash News Marathi: गुजरातच्या अहमदाबाद येथे १२ जून रोजी एक दुर्दैवी घटना घडली. एअर इंडियाचे ७८७-८ विमानाचा कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण जग हळहळून गेले आहे. या अपघाताचे अनेक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या अपघातातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.या अपघातात चहाची टपरी चालवणाऱ्या महिलेचा मुलागाही मृत पावला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एअर इंडियाचे हे विमान एका होस्टवर कोसळले होते. याच होस्टेलच्या जवळ एक चहाची टपरी देखील होती. या टपरीवर एक १६ वर्षांचा मुलगा झोपला होता. दरम्यान विमान केसळो तेव्हा मोठा स्फोट झाला आणि टपरीला देखील आग लागली.यावेळी आगीत मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईची धडपड सुरु होती. अगदी तिला भाजूनही मुलाला वाचवण्यासाठी आई रस्त्यावर सैरावैरा मदत मागत धावत होती. सध्या
मेघनानीनगर परिसरात दुपारी १.३१ च्या सुमारास एअर इंडियाचे विमान कोसळले. विमाना कोसळताचा भीषण स्फोट झाला आणि प्रचंड आग लागली. या आगीने आजूबाजूच्या दुकांनाना लपेटले. यावेळी तिथेच बाजूला असलेल्या एका चहाच्या टपरीला देखील आग लागली. ही चहाची टपरी सीताबेन नावाच्या महिलेची होती. दुपारच्या वेळी ग्राहक कमी होते. यावेळी तिचा १६ वर्षांचा मुलगा टपरीजवळ झोपला होता. यावेळी तो या भीषण आगीत अडकला. त्याची आई सीताबेनही मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात भाजली गेली. महिलेच्या घरच्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सीताबेन यांना रुग्णालयाते दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
Fact Check: विमान कोसळतानाचा ‘तो’ व्हिडिओ खरा की खोटा? अहमदाबाद दुर्घटनेनंतर होतोय व्हायरल
ये दृश्य मन को विचलित करता है,
दर्द का एहसास व्यथित करने वाला है.।
दु:खद😴🥲🥲#Ahmedabad#planecrashpic.twitter.com/XVgPOo8CUR
— 🌸🍃Indresh Mishra🇮🇳🍃🌸इन्द्रेश कुमार मिश्रा ✍️ (@Indresh19925) June 12, 2025
या अपघाताने संपूर्ण जग हादरला आहे. अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवणे देखील अतिशय कठी झाले आहे. यामध्ये २६५ वेदनादायी मृत्यू झाला आहे.एका मेडिकल कॉलेजच्या इरामतीला आणि वसतिगृहाला हे विमान धडकले. धडकल्यानंतर भला मोठा स्फोट झाला आणि आग लागली. सर्वत्र धूर परसला होता. अनेक लोक आरडाओरड करतच होते. या अपघातात विमानातील केवळ एक प्रवासी बचावला आहे. या घटनेचे थराराक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.