Ahmedabad Plane Crash Video: उड्डाणानंतर अवघ्या सात मिनिटांत विमानाचा स्फोट; भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, तर कधी आश्चर्यकारक व्हिडिओ देखील सोशल मीडिया व्हायरल होत असतात. शिवाय अपघातांचे काही भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या नुकत्याच अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान अपघाताचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या भयावह दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुजरातच्या अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळ भीषण अपघात घडला. एअर इंडियाचे ७८७ ड्रीमलाइनर विमान लंडनला निघाले असताना उड्डाणानंतर सात मिनिटांनी आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले. सध्या या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, विमानानाने नुकतेच उड्डाण केले आहे.
यानंतर ७ किलोमीटर अंतरावर जाताच विमानाला आग लागली आणि विमान खाली कोसळले. नंतर विमानाचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर हवेत काळ्या धूराचे लोट दिसायला लागले. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. या विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील असल्याचे म्हटले जात आहे. ६२५ फूट उंचावरुन हे विमान कोसळले. दुपारी १.३० च्या सुमारास या विमानाने उड्डाण केले होते. उड्डाणाच्या केवळ १२-१४ सेकंदातच ही दुर्दैवी घटना घडली.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने सर्वत्र दुखाचे वातावरण पसरलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच यामध्ये ब्रिटिश नागरिकांचा देखील समावेश होता. ब्रिटनचे पंतप्राधान कीर स्टारमर यांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.