
AI Humnoid Robo Viral Video
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही इंजिनियर्स एका खोलीत ह्यूमनॉइड रोबोटची टेस्टिंग करत आहेत. सुरुवातील रोबोट सर्व दिलेल्या कमांड अगदी व्यवस्थित फॉलो करतो. पण अचानक काहीतरी गडबड होते आणि रोबोट बेकाबू होतो. रोबोट वेगाने हात-पाय मारु लागतू. समोर येईल त्याला लाथा मारुन लागतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रोबोट त्याला ट्रेन करणाऱ्याला लाथ मारत आहे. त्याला थांबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु रोबो पूर्णपणे बेकाबू झाला आहे.
Rogue humanoid robot ATTACKS HUMANS with high kicks pic.twitter.com/FAHLBiQ3Au — Santosh Misra ‘mohit’ (@Santosh_misraa) July 5, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Santosh_misraa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, बिचाऱ्या रोबोटला ओव्हरटाईम करायला लावला असणार, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने बॉसने विकेंडलाही काम सांगितले असणार असे म्हटले आहे. तर काहींनी यावर चिंता व्यक्त केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, हा रोबोटमधील एखादा तांत्रिक बिघाड असू शकतो. ह्यूमनॉइड रोबोट्सला चालवण्यासाठी आणि स्वत:चा बॅलेन्स सांभाळण्यासाठी हजारो कोडिंग लाइन्स आणि सेन्सर्स असतात. यामध्ये काही बिघाड झाल्यास असे घडते. रोबोट पडायला लागतो तेव्हा त्याचे अल्गोरिदम त्याला पडण्यापासून वाचवण्यासाठी मोटर्सना वेगाने फिरवण्याचे आदेश देतात. यामुळे तो लाथा मारत असल्याचा भास होतो.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.