Ghost Rider : अत्र-विचित्र बाईकवर स्वार झाला एलियन, भयानक रूप अन् अनोखे दृश्य जे कोणी कधी पाहिले नसेल; Video Viral
आजकाल अनेकजण आपली वाहने वैयक्तिक आवडीनुसार कस्टमाइज करतात. काही मॉडिफिकेशन्स खरोखरच सुंदर आणि प्रभावी असतात, पण काही वेळा काहीजण असे बदल करतात की पाहणाऱ्याला हसू आवरत नाही. सध्या अशाच एका अनोख्या आणि विचित्र बाईकचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. व्हिडिओतील दृश्ये फारच अजब असून ते पाहून तुम्ही गोंधळूनही जाऊ शकता. चला यात काय दिसले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
या व्हिडिओमध्ये दिसणारी बाईक सामान्य बाईकसारखी अजिबात नाही. तिचे टायर, बॉडी डिझाइन, सीट आणि एकूण रचना पाहता ती कुठल्या तरी विज्ञान-आधारित चित्रपटातून थेट आली आहे, असे वाटते. बाईक इतकी अवघड आणि वेगळी दिसते की, ती रस्त्यावर पाहून कोणालाही धक्का बसेल. विशेष म्हणजे या बाईकवर बसलेला रायडरही पारंपरिक वेशभूषेत नसून, त्याने एलियनसारखा विचित्र पोशाख परिधान केला आहे. त्यामुळे संपूर्ण दृश्य एखाद्या परग्रहावरून पृथ्वीवर आलेल्या प्राण्याचे भासत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटले, तर काहींनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण म्हणतात की ही बाईक भविष्याची झलक आहे, तर काहीजण याला ‘एलियन राइड’ म्हणून हसत आहेत. सोशल मीडियावर सध्या याच बाईकची आणि तिच्या रायडरची चर्चा रंगली आहे.
Halloween costume brought to the next levelpic.twitter.com/Yen3zgLQow — Massimo (@Rainmaker1973) October 19, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Rainmaker1973 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा कोणता पोशाख आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे पाहून तर संपूर्ण एलियन समाज घाबरला असेल” आणखीन एका युजरने लिहिलं आहे, “अरे व्वा, हा तर खरा घोस्ट रायडर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.