(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियाच्या जगात नेहमीच काही ना काही घडत असतं. इथे अशा गोष्टी घडून येतात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. अशातच नुकतीच इंटरनेटवर एक धक्कादायक बातमी शेअर करण्यात आली आहे जिच्याविषयी ऐकून तुमचेही डोके चक्रावून जाईल. वास्तविक, व्यक्तीने जेव्हा आपल्या शरीराचा एक्स-रे काढला तेव्हा त्याला यात एक धक्कादायक गोष्ट दिसून आली ज्याने माणूसच काय तर डॉक्टरही हादरले. चला यात नक्की काय दिसून आलं ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
एका व्यक्तीने रेडिटवर दोन फोटोंसह एक पोस्ट शेअर केली. त्या माणसाने सांगितले की हे दोन्ही फोटो त्याच्या स्थानिक डॉक्टरांनी शेअर केले आहेत. तथापि, या फोटोंमध्ये जे दिसत आहे ते खूपच धक्कादायक आहे. हे फोटो एका माणसाचा एक्स-रे आहेत, ज्यामध्ये त्याच्या शरीरात एक मोठा डंबेल असल्याचे दिसून येते. त्या माणसाच्या शरीरावर डंबेलसारखी वस्तू असल्याचे पाहून डॉक्टरही थक्क झाले. तथापि, व्यक्तीची नंतर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर त्याच्या शरीरातून जे बाहेर पडलं ते खरोखरच धक्कादायक होत. माणसाच्या शरीरातून चक्क २.५ किलो वजनाचा डंबेल बाहेर काढण्यात आला. माहितीनुसार, जेव्हा डॉक्टरांनी त्याला इतका मोठा डंबेल शरीराच्या आत गेला कसा याविषयी विचारलं तेव्हा व्यक्तीने कोणतेही उत्तर देण्यात नकार दिला. रुग्णाला स्वतःच हे सांगता आले नाही की इतका मोठा डंबेल त्याच्या शरीरात कसा आला.
हे प्रकरण आता सोशल मीडियावर चांगलंच चांगलंच चर्चेत असून युजर्सही या घटनेने अचंबित झाले आहेत. या घटनेविषयीची पोस्ट @interestingpedia नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले असून एका युजरने लिहिले आहे, “तो व्यक्ती जिम लव्हर असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते गुंतागुंतीचे आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अशी कसली भूक लागली होती त्याला?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.