(फोटो सौजन्य: X)
सर्वांच्या आवडीचा प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी, आज दिवाळीचा पहिला दिवस. दिवाळीची मजा इतर सणांहून फार वेगळी आणि रंगतदार असते. घरी फराळाची मेजवानी, नवीन कपडे, दिवे, आकाशकंदील, फटाके अशा अनेक गोष्टी यात सामील असतात. अशातच आता दिवाळीच्या मुहूर्तावर एक अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एका तरुणाने चक्क एका वर्तमानपत्रापासून आकाशात उडणारा आकाशकंदील बनवून दाखवला. त्याची ही आयडिया अनेकांना आवडली आणि युजर्सने वेगाने हा व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा हातात वर्तमानपत्र घेऊन काहीतरी करत असल्याचे दिसते. पहिल्या दृष्टीक्षेपात तो नक्की काय करत आहे ते समजत नाही पण काही वेळातच एक सुंदर दृश्य आपल्या नजरेसमोर येते. मुलगा वर्तमानपत्राचा आधी चुरगळा करतो आणि मग एक विशेष आकार तयार करत त्याला आग लावतो. वर्तमानपत्र पेटताच तो हळूहळू हवेत उडतो आणि अवकाशात झेप घेतो. हवेत उडणारा हा जळता कंदील पाहायला फार सुंदर दिसतो. तरुणाचा हा जुगाड लोकांना इतका आवडतो की त्याला लाखोंच्या लाइक्स मिळतात. व्हिडिओतील दृश्ये पाहून अनेकांना आश्चर्य वाटले तर काहींनी हा जुगाड घरी ट्राय करणार असल्याचे म्हटले.
मैं सरकार से रिक्वेस्ट करता हूं की इसे भारत रत्न से सम्मानित किया जाए.
..😂😂😂😂 pic.twitter.com/vMlgrdcRiY — Banwari Sheshma (@RLP__Sheshma) October 18, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @RLP__Sheshma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कोणते तरी रहस्य लपले आहे यात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जुनी झाली ही ट्रिक” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कागद जळतो आणि लगेच विघटित होतो; तो एकत्र चिकटलेला नाही, म्हणून हा मूर्खपणा आहे, उगाच लोकांना वेड बनवू नका”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.