
अरे बापरे... ट्रेनच्या पार्सल कोचमध्ये घुसवली अख्खी रिक्षा! VIDEO पाहून सोशल मीडिया यूजर्सही चक्रावले
अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रिक्षाचालक आपल्या राज्यात परतत असल्याचा दावा केला आहे. पण जाताना तो एकटा राज्य सोडत नसतो तर आपल्या रिक्षालाही सोबत घेऊन जाण्यासाठी रेल्वेच रिक्षा कोंबण्याचा प्रयत्न करत असतो. हा अनोखा प्रकार पाहून सोशल मिडिया यूजर्स थबकले असून व्हिडिओवर असंख्य प्रतिक्रियांचा वर्षाव होताना दिसून आला आहे.
काय घडलं व्हिडिओत?
घटना नेमकी कोणत्या रेल्वे स्थानकावर घडून आली आहे याची माहिती व्हिडिओत देण्यात आलेली नाहीये. आरटीओ (RTO) कारवाईची भीती आणि मराठी भाषा शिकण्याचा दबाव यामुळे रिक्षाचालक महाराष्ट्र सोडून उत्तर प्रदेश आणि बिहारला परत जात आहेत असा दावा यात करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये एका ट्रेनच्या एसएलआर (SLR) किंवा पार्सल डब्यात रिक्षा चढवली जात असल्याचे दिसते. रिक्षा दारात अडकली असून काही लोक धक्का मारत तिला रेल्वेच्या आतमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करत असतात. ही घटना सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत असून व्हिडिओतील दाव्याविषयी अधिकृत पुष्टी झाली नाही.
LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @hasleyoriginals नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हा देश समस्यांनी भरलेला नाही तर वेड्या लोकांनी भरलेला आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेव्हा इतर राज्ये स्थानिक भाषा न बोलणाऱ्या मराठी लोकांसोबत भेदभाव करतात, तेव्हा कोणीही त्याकडे फारसे लक्ष देत नाही; पण जेव्हा आपल्या राज्यातील लोक म्हणतात की ‘इथे राहायचे असेल तर स्थानिक भाषा बोललीच पाहिजे’, तेव्हा मात्र सर्वांना आग लागते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांच्यावर इतका ताण आणण्याची काही गरज नव्हती ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.