गजराजाला छेडणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, धावत पळत आला अन् पायदळीच तुडवला जीव; थरारक Video Viral
सोशल मीडियावर अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. इथे फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचेही बरेच व्हिडिओज शेअर केले जातात आणि अशातच इथे आणखीन एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात गजराजाचा प्रकोप गगनाला भिडल्याचे दृश्य दिसून आले. वास्तविक घडलं असं की, व्यक्तीने हत्तीचा राग अनावर केला ज्यानंतर हत्तीने पळत पळत त्याची अशी हजामत केली की सर्वजण पाहतच राहिले. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
हत्ती हा एक शांत प्राणी आहे, ते अनेकदा माणसांमध्ये मिळून मिसळून राहतात पण एकदा का हत्तीला त्याचा राग अनावर झाला की मग ते संपूर्ण जग डोक्यावर घेतात. हत्तीसारख्या विशालकाय प्राण्याशी पंगा घेणं खरंतर खूप महागात पडू शकतं आणि असाच काहीसा प्रकार व्यक्तीसोबत घडताना दिसून आला. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसून येते की, रस्त्याच्या मधोमध एक हत्ती गाजर खात आहे. हत्ती उभा असल्याचे पाहून, रस्त्यापासून थोड्या अंतरावर लोकांचा जमाव उभा होता, जे हत्तीला पाहत आहेत. एकीकडे लोक शांतपणे दूरवरून हत्तीला पाहत आहेत, तर दुसरीकडे एक माणूस हत्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, मग काय. समोरच्या माणसाला पाहून हत्तीला राग येतो आणि तो त्याच्या मागे धावू लागतो. हत्ती येताना पाहून तो माणूस घाबरतो आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी वेगाने त्याच्या मागे पळू लागतो.
हत्तीला आपल्याकडे वेगाने पळत आल्याचे पाहून व्यक्ती जोरात पळू लागतो पण हत्तीही काही हार मनात नाही. संतप्त हत्ती पळत पळत व्यक्तीच्या मागे जातो आणि अखेर त्याला रस्त्यात गाठून तो त्याला पायदळीच तुडवतो. यांनतर खरंतर व्यक्तीचा जीव जातोय की काय असंच सर्वांना वाटू लागतं पण नशीब त्याला साथ देतं आणि हत्ती अचानक आपला राग सोडून त्याला सोडून देतो ज्यामुळे व्यक्तीचा जीव थोडक्यात वाचतो. हत्तीच्या या प्रकोपाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @wildkarnataka नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो माणूस यासाठी पात्र आहे, त्याला त्याची किंमत मोजू दे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खरा प्रश्न असा आहे की आजूबाजूला इतके लोक त्यांच्या गाड्यांमधून का बाहेर पडत आहेत? ते हाताळण्यासाठी अधिकारी कुठे आहेत? ते उद्यानाच्या आत आहे का?.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही