Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीचा शिरच्छेद करु पाहणाऱ्या पतीला लोकांनी भरस्त्यात दिला चोप, बंगळूरुतील घटनेचा Video Viral

Bengaluru Viral Incident : भररस्त्यात पतीने केला पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न? घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून यात लोकांनी मिळून पतीच्या तावडून पत्नीचा जीव वाचवल्याचे दिसून येते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 08, 2026 | 12:27 PM
पत्नीचा शिरच्छेद करु पाहणाऱ्या पतीला लोकांनी भरस्त्यात दिला चोप, बंगळूरुतील घटनेचा Video Viral

पत्नीचा शिरच्छेद करु पाहणाऱ्या पतीला लोकांनी भरस्त्यात दिला चोप, बंगळूरुतील घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • भररस्त्यात घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
  • परिस्थिती गंभीर होताच आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ हस्तक्षेप करत मोठी भूमिका बजावली.
  • घटनेनंतर नेटकऱ्यांनी लोकांच्या कृतीचे कौतुक करत विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
बंगळूरुतील एका धक्कादायक व्हिडिओने सध्या संपूर्ण इंटरनेटवर धूमाकूळ माजवला आहे. व्हिडिओमध्ये पती भररस्त्यात पत्नीवर हल्ला करताना दिसला. हे दृष्य पाहून असे वाटले जणू तो तिला मारुन टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण काही क्षणातच परिस्थिती बदलली आणि आजूबाजूच्या लोकांनी पतीलाच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीच्या मदतीसाठी धावून आलेल्या लोकांची आता सोशल मिडियावर प्रशंसा केली जात असून पतीच्या वर्तवणूकीसाठी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याची मागणी यूजर्सने केली आहे. घटनेत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

बर्थडे सेलिब्रेशनमध्ये अनोखा ट्विस्ट! गर्लफ्रेंडसोबत पार्टी करताना पकडला गेला नवरा; बायकोच्या एंट्रीनंतर पाहा काय घडलं,Video Viral

काय आहे प्रकरण?

घडलेली घटना बंगळूरच्या रस्त्यांवर घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक पुरुष बाईकवरुन जात असतानाच समोरुन त्याची पत्नी येते. तिला पाहताच तो बाईक थांबवतो आणि रस्त्याच्या कडेला पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात करतो. या मारहाणीत तो पत्नीचा गळा देखील पकडतो. . सुरुवातीला आजूबाजूचे लोक परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे जाणवताच लोक धावत पळत मदतीसाठी येतात आणि पतीला मारहाण करण्यास सुरुवात करतात.

वेगाने पुढे जात असलेल्या या जगात मदतीची अपेक्षा करणं जरा कठीण झालं आहे. आजकाल कोणतीही गंभीर घटना घडली की लोक मदतीचा हात पुढे करण्याऐवजी लगेच त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करु लागतात. मात्र या घटनेत याउलट गोष्टी घडताना दिसल्या जे पाहून यूजर्स खुश झाले. लोकांनी फक्त तमाशा न पाहता वेळीच महिलेची मदत करत तिला पतीच्या तावडीतून सोडल्याने इंटरनेवर यूजर्सद्वारे प्रशंसा केली जात आहे.

Proud of you Bengaluru and these Youngsters who refused to let a lunatic b¢head his wife; instead of watching and making videos, they decide to act: pic.twitter.com/yMyg64brsB — Mihir Jha (@MihirkJha) May 7, 2026

साहसी खेळ जीवावर बेतला! गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करताना दोर गळ्यात अडकला अन् तरुणीने समोर पाहिला यमराज

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @MihirkJha नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “इथे संदर्भ (Context) कुठे आहे??? योग्य संदर्भ असल्याशिवाय, तो बरोबर आहे की चूक, हे आपण कसे सांगू शकतो?? कदाचित ती त्याची मुलगी असेल, जिने एखाद्या ‘छपरी’ प्रियकरासाठी घर सोडले आणि ती रस्त्यावर सापडली असेल?….अशा प्रकारचा प्रसंग पोस्ट करताना योग्य संदर्भ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अतिशय उत्तम काम!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे व्वा! हे पाहून मला खूपच आनंद झाला. एका व्यक्तीने पुढाकार घेतला आणि इतरांनाही तसा संकेत दिला. आपल्याला नेमकं हेच हवं आहे!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Bengaluru husband tried to attack wife on road shocking incident video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • beating video
  • Husband and wife
  • Video Viral
  • viral news
  • women safety

संबंधित बातम्या

Couple Romance : अरे आवरा यांना! भररस्त्यात कारच्या छतावर बसून कपल्सचे अश्लील चाळे; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त
1

Couple Romance : अरे आवरा यांना! भररस्त्यात कारच्या छतावर बसून कपल्सचे अश्लील चाळे; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

मृत्यूच्या जाळ्यातून परतला…! ट्रेन आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकला जीव, RPF जवानाने खेचून काढलं बाहेर; घटनेचा Video Viral
2

मृत्यूच्या जाळ्यातून परतला…! ट्रेन आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकला जीव, RPF जवानाने खेचून काढलं बाहेर; घटनेचा Video Viral

जगातील सर्वात धोकादायक नोकरी, काम फक्त दिवे लावण्याचं अन् पगार कोट्यवधी रुपये; प्रत्येक क्षणी असतो मृत्यूचा धोका…
3

जगातील सर्वात धोकादायक नोकरी, काम फक्त दिवे लावण्याचं अन् पगार कोट्यवधी रुपये; प्रत्येक क्षणी असतो मृत्यूचा धोका…

बाईई हा काय प्रकार! छतापासून रस्त्यापर्यंत पसरली वरच्या गळ्यात घातलेली पैशांची माळ, पकडायला लागली डझनभर लोक; Video Viral
4

बाईई हा काय प्रकार! छतापासून रस्त्यापर्यंत पसरली वरच्या गळ्यात घातलेली पैशांची माळ, पकडायला लागली डझनभर लोक; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.