(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
घडलेला हा सर्व प्रकार गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. साहसी खेळ खेळण्याच्या नादात महिलेचा जीव धोक्यात आला आणि तिने आयुष्यातील सर्वात वाईट क्षणांचा अनुभव घेतला. व्हिडिओत दिसते की, पाण्याच्या मधोमध बोटला रश्शी बांधून महिला पॅराग्लायडिंगची मजा लुटत आहे. पण काही क्षणातच परिस्थिती बिघडते आणि ती हवेत उडण्याऐवजी पाण्यात डुबु लागते. पॅराग्लायडिंगचा दोर तिच्या गळ्याजवळ आलेला असतो जे पाहून ती घाबरते, वाचण्यासाठी धडपड करते आणि हे संपूर्ण दृष्य पाहणे थरारक ठरते. सुदैवाने महिलेचा जीव या परिस्थितीतून वाचला पण हा जीवघेणा अनुभव तिच्या मनात दडून राहिला.
View this post on Instagram
A post shared by nutritionist | Manifestation believer (@dt_sushmitha_br_gowrav)
महिलेने @dt_sushmitha_br_gowrav नावाच्या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओला शेअर केले आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने सांगितले की, केवळ एका क्षणाच्या थरारासाठी तिने सर्वस्व पणाला लावले. या साहसाची सुरुवात जरी खूप मजेत झाली असली, तरी तिचा आनंद लवकरच दहशतीत बदलला. समुद्राच्या मध्यभागी असताना, एक दोर तिच्या गळ्याभोवती अडकला. त्या क्षणी तिला वाटलेली भीती शब्दात वर्णन करणे कठीण आहे. तिची सुटका झाल्यामुळे ती खूप नशीबवान होती. मात्र, अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही. जर तुम्ही कोणताही जलक्रीडा प्रकार करत असाल, तर तो करण्यापूर्वी तुम्ही सुरक्षेची खात्री करून घेतली पाहिजे. महिलेचा हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार ट्रेंड करत असून यातून आपल्याला शिकवण मिळते की, कधीही कोणता साहसी खेळ खेळताना पहिले आपल्या जीवाची काळजी घ्यायला हवी.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






