(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
घडलेली सर्व घटना मध्य प्रदेशातील मंदसाैर जिल्ह्यातून समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय झुल्फिकार अली आपल्या ३८ वर्षीय प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये तिचा वाढदिवस साजरा करायला आला होता. पत्नीला जेव्हा या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा रात्री सुमारे ११ वाजता ती भाऊ आणि वहिनीसोबत हॉटेलमध्ये दाखल झाली. खोलीचा दरवाजा उघडताच पत्नीने पतीला पाहिलं आणि ती संतापली. तिने फक्त पतीचीच नाही तर त्याच्या प्रेसयीची देखील जोरदार धुलाई केली. व्हिडिओमध्ये पत्नी, तिचा भाऊ आणि वहिनी रंगेहात पकडल्या गेलेल्या झुल्फिकार आणि त्याच्या प्रेयसीला बेदम मारत हाॅटेल रुममधून बाहेर काढताना दिसून येतात.
मध्य प्रदेश के मंदसौर में एक होटल के कमरे में पति अपनी प्रेमिका का जन्मदिन मना रहा था, तभी उसकी पत्नी वहां पहुंच गई। पत्नी ने पति और उसकी प्रेमिका को कथित तौर पर रंगे हाथ पकड़ लिया, जिसके बाद होटल में जमकर हंगामा हुआ। खबर के मुताबिक 50 वर्षीय जुल्फिकार अली अपनी 38 वर्षीय… pic.twitter.com/5meH0Wet3N — Dev Choudhary (@Devchoudharydc) May 7, 2026
हे प्रकरण पुढे इतकं वाढलं की पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्याच नेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर झुल्फिकार अली आणि त्याच्या प्रेयसीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर जेव्हा पोलीस पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा झुल्फिकारचे कुटुंबीय आधीच निघून गेले होते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पोलिसांनी झुल्फिकार अली आणि त्याच्या प्रेयसीला सोडून दिले. माहितीनुसार, झुल्फिकार हा एक डाॅक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @Devchoudharydc नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






