या व्हिडिओतून झाली होती सुरजच्या करियरला सुरुवात, टिकटॉकचा तो पहिला गोलीगत व्हिडिओ पुन्हा व्हायरल, तुम्ही पाहिलात का?
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. मराठी सेलेब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वचजण सुरजचे कौतुक करत आहेत. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्याला फोन करून सुरजला भेटीचं आमंत्रण दिलं. यावरूनच त्याची क्रेझ लक्षात येते.
सुरज सोशल मीडियावर रिल्स बनवून फेमस झाला आणि आता बिग बॉसनंतर तो एक सेलेब्रिटी बनला आहे. यादरम्यान आता सुरजचा टिक टॉकवरील पहिला व्हिडिओ आता सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. अनेकांना सुरज आधी कोण होता हे माहिती नसल्याने आता लोक रस घेऊन हा व्हिडिओ पाहत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही दंग व्हाल.
हेदेखील वाचा – पाकिस्तान ते पाकिस्तानच! विधानसभेत गदारोळ, आमदारांनी लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, Video Viral
बिग बॉसच्या घरात बाकी सदस्य चपळतेने गेम खेळू लागले मात्र सुरजने आपल्या साध्या सरळ वागण्याने लोकांची मनं जिंकली. बिग बॉसच्या सीजनमध्ये कोणी ट्रॉफी घेऊन जातं तर कोणी लोकांची मनं, पण सुरज हा असा एकमेव सदस्य आहे ज्याने ट्रॉफीसह लोकांची मनंदेखील जिंकली. सुरजची खेळाडू वृत्ती आणि सर्वांचा मान राखून वागणे प्रेक्षकांना फार भावले आणि म्हणूनच अधिक वोट्स मिळवत तो बिग बॉसचा विनर ठरला. बिग बॉसमधील सुरजचे डायलॉगदेखील बाहेर फार व्हायरल झाले.
हेदेखील वाचा – लड्डू मुत्त्यानंतर आता आलेत ‘पिस्तुल्या बाबा’, भक्तांना गोळी घालून देतात आशीर्वाद, Viral Video पाहून हसू आवरणार नाही
सध्या व्हायरल होत असलेला सुरजचा पहिला व्हिडिओ @viralinmaharashtra नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सुरज आपल्या गोलीगत स्टाइलमध्ये गाणे म्हणताना दिसत आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही हसा पन आज तुमच्यापेक्षा पुढे आहे सूरज” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “झिरो टू हीरो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दिवस प्रत्येकाचे येत असतात हे तू सिद्ध करून दाखवलास”.