भारतात अनेक वेगवगेळ्या धर्माची, जातीची आणि विचारसरणीची लोक राहतात. मात्र या फारकात एक गोष्ट सारखीच आणि ती म्हणजे लोकांची श्रद्धा. देशात धार्मिक पंथाची अनेक लोक पाहायला मिळतात. मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक बारीकशी रेष असते. ही रेष कधी ओलांडली जाते ते अनेकदा लोकांना समजत नाही. आपल्या श्रेद्धेचा फायदा घेत देशात अनेक नवनवीन बनावटी साधू बाबा लोकांचा फायदा घेत आहेत.
मागेच सोशल मीडियावर लड्डू मुत्त्या नावाचा एक बाबा फार व्हायरल झाला आहे. यात तो पंख्याला हाथ लावून तो लोकांना आशीर्वाद देताना दिसून आला होता. लोकांनी या व्हिडिओची फार मजा घेतली आणि त्यानंतर आता पुन्हा अशाच एका विचित्र बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये झळकणाऱ्या व्यक्तीला लोकं ‘पिस्तुल्या बाबा’ असे म्हणतात. या बाबांची आशीर्वाद देण्याची अनोखी पद्धत पाहून तुम्हाला हसू अनावर होईल. अनेकजण हा व्हिडिओ पाहून आता याची मजा घेत आहेत.
हेदेखील वाचा – एक चायवाला दिवसाला किती पैसे कमावतो? व्हिडिओतील कमाई पाहून आवाक् व्हाल, डिग्री द्याल फाडून …
सोशल मीडियावर तुम्ही लड्डू मुत्त्या बाबांची क्रेझ सर्वांनीच पाहिली. त्यानंतर आता पिस्तुल्या बाबांची भक्तांना आशीर्वाद देण्याची अनोखी पद्धत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओत दिसते की, हे बाबा लहान मुलांच्या खेळण्यातील पिस्तुलाने भक्तांना आशीर्वाद देतात. यात दिसते की, एक महिला या बाबांसमोर बसली असून ती त्यांना आपली समस्या सांगते त्यांनतर बाबा खेळण्यातील दोन पिस्तूल बाहेर काढतात आणि तिच्यावर रोखून धरतात. यानंतर महिलेच्या अंगात काहीतरी बदल होतात आणि ती डुलू लागते.
हेदेखील वाचा – भररस्त्यात तरुणीने काढले कपडे, लोकं पाहतच राहिले, Video Viral
व्हिडिओतील हास्यापद दृश्ये पाहून तुम्ही निश्चितच पोट धरून हसाल. हा व्हायरल व्हिडिओ @cartoonland._ नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, नवीन बाबा असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “टॉय गन बाबा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाबाच्या गनची बॅटरी संपली तर मग बाबा काय करेल”.