(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडिया एक असे डिजिटल प्लॅटफॉर्म जिथे दररोज हजारो व्हिडिओ शेअर होत असतात. लोक इथे व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओ आवडताच त्याला शेअर करू लागतात. इथे बऱ्याचदा अशा काही घटनांचे व्हिडिओही शेअर होतात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसावा. हे असे व्हिडिओ आपल्याला नेहमीच थक्क करून जातात. आताही इथे अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये फारच धक्कादायक असून ती तुम्हाला हेलावून टाकू शकतात. नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
सदर घटना नोएडातील एका लग्नसमारंभातील असून यात एका चिमुकल्याला गोळी लागल्याची घटना घडून आली आहे. वास्तविक, लग्नाची मिरवणूक सुरु असते. व्हायरल व्हिडिओत तुम्हाला लोक या मिरवणुकीत थिरकताना दिसतील. याच वेळी एक अडीच वर्षांचा मुलगा आपल्या त्याच्या कुटुंबासह त्याच्या इमारतीच्या बाल्कनीतून लग्नाच्या मिरवणुकीत नृत्याचा आनंद घेत होता. याचवेळी मिरवणुकीतील दोन व्यक्ती हवेत गोळीबार करतो. ही गोळी वरून मिरवणूक पाहत असलेल्या मुलाला बसते. यावेळी तो आपल्या वडिलांच्या कुशीत बसलेला असतो. आपल्या हाताला रक्त लागल्याचे पाहतच त्याच्या वडिलांना घटनेची जाणीव होते आणि तातडीने ते त्याला रुग्णालयात दाखल करतात मात्र यात त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर सांगतात.
दरम्यान यात मुलाच्या डोक्यात गोळी लागल्याचे वृत्त आहे. ही घटना नोएडातील सेक्टर 49 पोलिस स्टेशन हद्दीतील आघापूर गावात घडली आहे. घटनेची दखल घेत पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सुरु असून आता पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. या भयानक घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे, जो आता वेगाने व्हायरल होत आहे. लोक यातील दृश्ये पाहून हैराण झाले असून अनेकजण आता या घटनेवर योग्य त्या कारवाईची मागणी करत आहेत.
#noida आगाहपुर में बारात चढ़ने के दौरान हुई हर्ष फायरिंग में बारात देख रहे ढाई साल के बच्चे की गोली लगने से मौत। सेक्टर-49 थाना क्षेत्र का मामला। @NBTDilli @noidapolice @Uppolice pic.twitter.com/Hki7CH2n3I
— Ankit tiwari/अंकित तिवारी (@ankitnbt) February 17, 2025
घटनेचा लाइव्ह थरार @ankitnbt नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आघापूर येथे लग्नाच्या मिरवणुकीत झालेल्या गोळीबारात लग्नाची मिरवणूक पाहणाऱ्या अडीच वर्षाच्या चिमुरड्याचा गोळीबारात मृत्यू झाला. सेक्टर-49 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरण’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आपण असंस्कृत समाज आहोत. अशा सर्व दुर्घटनांना एक-दोन व्यक्ती नाही तर समाजच जबाबदार आहे. गरीब पोरं! आई-वडिलांबद्दल वाईट वाटते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांना फाशीवर चढवा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.