(फोटो सौजन्य: Youtube)
जंगलात, सिंह आणि सिंहिणीचे नाव शक्ती आणि वर्चस्वाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या बलाढ्य शक्तीपुढे मोठंमोठे प्राणीही त्यांच्यापुढे नथमस्तक होतात. त्याच्या या शैलीमुळेच त्यांना जंगलाचा राजा आणि राणी ही पदवी देण्यात आली आहे. आता या जंगलाच्या राजाचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात तो प्राण्यांची शिकार करताना दिसून आला. त्यांच्या डरकाळ्यामुळे इतर प्राणी घाबरतात. मात्र आता एका सिंहिणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे यात काही जंगली प्राण्यांनी तिला घेतल्यास दिसून येत आहे. यात पुढे काय घडते ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका सिंहिणीला तरसांच्या एका ग्रुपने जाळ्यात अडकल्याचे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून हे समजू शकते की कधीकधी शक्तिशाली शिकारी देखील जंगलात अडचणींचा सामना करतात. जेव्हा सिंहीण जंगलात भक्ष्याच्या शोधात निघाली तेव्हा हायनाच्या एका गटाने तिला घेरले आणि हल्ला केला. या परिस्थितीत सिंहीण खूपच कमकुवत दिसली आणि तिला पळून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तरसांचा एक गट तिच्याकडे सरकत असताना सिंहीणी थकली आणि एका जागी बसली. या तरसांनी मिळून सिंहिणीला चारही बाजूंनी घेरले आणि हल्ला करायला सुरुवात केली. सिंहीणीला कोणत्याही प्रकारे आपली ताकद वापरण्याची संधी मिळाली नाही. तरस तिच्यावर हल्ला करत तिला चावू लागतात. सिंहीणीची इच्छा असूनही त्यांना तेथून दूर करता येत नाही. पुढे कसेबसे सिंहीण तेथून वेगाने पळते आणि आपला जीव वाचवते. हा हल्ला टाळण्यात सिंहिणीला यश आले असले तरी ही लढत तिच्यासाठी सोपी नव्हती. तिने जंगलात पळून आपला जीव वाचवण्यात यश मिळवले, परंतु तरसांनी तिचा पाठलाग करणे थांबवले नाही. त्यांनी सिंहिणीला त्रास देणे सुरूच ठेवले, यावरून असे दिसून येते की कधीकधी सिंहीणही शिकारींच्या हातून हरू शकते.
जंगलातील हा अनोखा व्हिडिओ @Latest Sightings नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘म्हातारी सिंहीण तरसांच्या टोळीतून पळून जाण्याचा प्रयत्न करते’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते जीवनाचे वर्तुळ आहे. तिच्यासोबत तिचा अभिमान नव्हता ही लाजिरवाणी गोष्ट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गरीब मुलगी.. ती पळून गेली हे जाणून आनंद झाला आणि कदाचित तिच्या अभिमानाचे रक्षण केले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.