धक्कादायक! पाईपमध्ये रॉकेट टाकून थेट व्यक्तीच्या अंगावर सोडला अग्निबाण, Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का
दिवाळीच्या काही दिवस आधी फटाक्यांचा हंगाम सुरू होतो. अशा स्थितीत अनेक लोक फटाके जाळतात आणि इतरांच्या घरात फेकून धिंगाणा घालतात. काहीवेळा, केवळ मौजमजेसाठी ते इतरांवर फटाके फोडतात. अशाच काही कारामतींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओतील दृश्ये पाहून तुम्हाला धडकी भरेल. यात काही तरुणांनी मिळून मजामस्तीसाठी एका व्यक्तीच्या अंगावर चक्क जळता रॉकेट सोडल्याचे दिसून येत आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या घराबाहेर खुर्चीवर आराम करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, दोन मस्तीखोर मुलं यावेळी त्या तरुणाकडे येतात आणि भिंतीच्या मागे लपून त्याच्याकडे पाईप दाखवतात. यानंतर ती मुले त्या पाईपमध्ये रॉकेट ठेवून पेटवतात आणि त्या तरुणाच्या दिशेने निशाणा साधत गोळीबार करतात. पुढच्याच क्षणी हे पेटलेले रॉकेट खुर्चीवर बसलेल्या तरुणावर आढळते आणि तो घाबरतो. जळत्या रॉकेटच्या वाराने तो हादरतो आणि खुर्चीवरून खाली पडतो. त्यानंतर तो त्याच्या कपड्यांना लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो.
हेदेखील वाचा – क्षणार्धात मृत्यूने गाठलं! तरुणाने अचानक काही सेकंदातच मित्रांसमोर सोडले प्राण, घटनेचा थरारक Video Viral
व्हिडिओतील घटना फार धक्कादायक असून असे करणे कोणाच्या जीववर देखील बेतू शकते. बदलत्या काळानुसार लोकांच्या भावना आणि क्रूरतेचा लाटेत देखील बदल झालेले दिसून येत आहेत. आपण केलेल्या कृतीचे पुढे काय परिणाम होऊ शकतात याचा लोक विचार करत नाही आणि शुल्लक आनंदासाठी एखाद्याच्या जीवावर बेतणारी मजा करू पाहतात. व्हिडिओतील घटनेमुळे तरुणाला नक्कीच दुखापत झाली असावी मात्र पुढे त्याचे काय झाले याबाबत कोणतीही अधिकृती माहिती मिळाली नाही. पण हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्की नक्कीच बसू शकतो.
पाइप में डालकर रॉकेट सीधे भाईसाहब पर लॉन्च कर दिया 😆😆😆 pic.twitter.com/p43VSoadY4
— Nisha (@y_iamcrazyy) October 24, 2024
हेदेखील वाचा – फोनच्या नादात आयुष्यभराची अद्दल घडली! दोन खडकांच्या मधोमध अडकली महिला, उलटे पाय अन् थरारक दृश्ये मन हेलावून टाकतील
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @y_iamcrazyy नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पाईपमध्ये रॉकेट टाकून थेट भाईसाहेबांवर लाँच केले’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 1 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप धोकादायक लोक आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा विनोद नाही, हे लोक कोणाच्या तरी जीवाशी खेळत आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.