सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी आपल्याला थक्क करतात. यात बऱ्याचदा असेही काही व्हिडिओ असतात ज्यांना पाहून आपल्या पायाखालची जमीन हादरते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओतील थरारक दृश्ये तुमचे हृदय पिळवटून टाकेल. यात एका व्यक्तीच्या मृत्यूची धक्कादायक घटना कैद झाली आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून आता अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.
काय आहे प्रकरण?
सदर घटना मध्य प्रदेशातील रेवामधील आहे. इथे एक तरुण त्याच्या मित्रांसह एका दुकानात हसत खेळत गप्पा मारत होता, मात्र याचवेळी अचानक ह्रदय विकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वजण शॉक झाले आणि मस्तीचे वातावरण दुःखात बदलले. तरुणाच्या मृत्यूचा लाईव्ह थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, जो आता व्हायरल झाला आहे.
हेदेखील वाचा – फोनच्या नादात आयुष्यभराची अद्दल घडली! दोन खडकांच्या मधोमध अडकली महिला, उलटे पाय अन् थरारक दृश्ये मन हेलावून टाकतील
ही घटना 20 ऑक्टोबर रोजी घडून आली. रीवामधील बजरंग नगर येथील रहिवासी प्रकाश सिंह बघेल हा त्याच्या काही मित्रांसह एका दुकानात हसत- खेळत गप्पा मारत बसला होता, पण अचानक तो जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मित्रांनी त्याला लगेच उचलले आणि टेबलवर नेऊन बसवले मात्र काय घडले हे समजेपर्यंत फार उशीर झाला होता. यानंतर मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याला मृत म्हणून घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
एक और लाइव मौत;
मध्य प्रदेश के रीवा में दोस्तों के साथ हंसते-बोलते हुए एक युवक अचानक नीचे गिरा और उसकी मौके पर ही मौत हो गई।
डॉक्टर ने मौत का कारण हार्ट अटैक बताया है। देखिए वीडियो ..#Livedeath #MPNews pic.twitter.com/r8WAokupAx
— Vinay Saxena (@vinaysaxenaj) October 24, 2024
हेदेखील वाचा – Viral: निर्दयतेचा कळस! कर्मचाऱ्याचा झाला अपघात, बॉसने पाठवला असा मेसेज… पाहून तुमचाही राग अनावर होईल
मृत्यूचा हा थरारक व्हिडिओ @vinaysaxenaj नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आणखी एक जिवंत मृत्यू; मध्य प्रदेशातील रेवा येथे मित्रांसोबत हसत-खेळत बोलत असताना अचानक एक तरुण खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे.’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेय आहेत. एका युजरने लिहिले आहे,”एखाद्या तरुणालाही हृदयविकाराचा त्रास होत असल्यास काय करावे, हे प्रत्येकासाठी खूप धोकादायक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे,”CPR दिले असते तर बरे झाले असते”.