सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा काही धकाकदायक घटना देखील शेअर केल्या जातात. यांमधील दृश्ये अनेकदा आपल्याला थक्क करून जातात. काही व्हिडिओ तर इतके थरारक असतात की त्यांना पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक भीतीदायक असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील थरारक दृश्ये पाहून आता अनेकांच्या पायाखालची जमीन हादरली आहे. आपली एक चूक आपल्या जीवावर कशी बेतू शकते याचे उत्तम उदाहरण आपण यातून पाहू शकतो.
काय आहे प्रकरण?
एका महिलेचा फोन दोन मोठ्या खडकांमध्ये पडला आणि तो उचलण्याच्या प्रयत्नात ती त्या खडकांच्या आत जाऊन अडकली. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील हंटर व्हॅली परिसरात ही घटना घडली, जेव्हा ती महिला तिच्या मित्रांसह जंगलात फिरत होती. महिलेने खडकांमधून तिचा फोन काढण्याचा प्रयत्न केला, पण ती घसरली आणि तीन मीटर खोल दरीत जाऊन पडली. महिलेने खडकांमधून तिचा फोन काढण्याचा प्रयत्न केला, पण ती घसरली आणि तीन मीटर खोल दरीत अडकली. या भागात फोनचे नेटवर्क मर्यादित होते, त्यामुळे तिच्या मित्रांनी तिला मदत करण्याचा तासभर प्रयत्न केला. जेव्हा ते यशस्वी होऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी मदतीसाठी एमरजेंसी सर्विसशी संपर्क साधला.
हेदेखील वाचा – Viral: निर्दयतेचा कळस! कर्मचाऱ्याचा झाला अपघात, बॉसने पाठवला असा मेसेज… पाहून तुमचाही राग अनावर होईल
त्यानंतर एक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळावरील दृश्ये पाहून सर्वचजण थक्क झाले. यानंतर पॅरामे खडक हटविण्यासाठी विशेष पथकालाही पाचारण करण्यात आले. एका खडकाचे वजन सुमारे 500 किलोग्रॅम होते, जे यशस्वीरित्या काढण्यात आले आणि महिलेच्या बचावासाठी जागा तयार केली. हे रेस्क्यू ऑपरेशन फार अवघड होते कारण ती महिला ‘S’ वळणात अडकली होती. इथून बाहेर निघणे काही सोपे काम नाही. मात्र सुदैवाने ती इथून बाहेर पडली आणि तिचा जीव बचावला.
NSW रुग्णवाहिका विशेष बचाव पॅरामेडिक पीटर वॅट्स यांनी हे ऑपरेशन त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात अनोखे ऑपरेशन असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “माझ्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत मी असे काम पाहिले नाही. ते आव्हानात्मक पण अत्यंत समाधानकारक होते.” ते पुढे म्हणाले, “प्रत्येक एजन्सीची भूमिका बजावायची होती आणि आम्ही सर्वांनी मिळून रुग्णासाठी चांगला परिणाम साधला. “हे बचावकार्य एकूण सात तास चालले, त्यानंतर महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. तथापि, तिला आपल्या फोनविनाच घरी परतावे लागले. हंटर व्हॅली हे सिडनीच्या उत्तरेला असून ऑस्ट्रेलियातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
हेदेखील वाचा – Viral Video: काळ आला की मृत्यू अटळ आहे! पाहा वेळ आली माणूस कसा जाळ्यात अडकतो
या घटनेचा व्हायरल फोटो @nswambulance नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात महिला दोन भल्यामोठ्या खडकांच्या आत अडकली असून तिचे फक्त उलटे पाय दिसत आहेत. हे संपूर्ण दृश्य पाहून आता अनेकांना धडकी भरली आहे. अनेकांनी पोस्टवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कधीकधी तुम्हाला फोन सोडावा लागतो, तो बदलता येतो, तुम्ही नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या परिस्थितीत व्यक्तीला वाचवू शकणारे हे पुरुष आणि स्त्रिया किती अविश्वसनीय आहेत! यांच्यासाठी टाळ्या तर बनतात”.