
फोटो सौजन्य सोशल मिडिया
या व्हिडिओ मध्ये काही स्त्रिया एका मुलासोबत दुकानात बसल्या होत्या.या सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या; नेमक्या त्याच क्षणी 280 ग्रॅम सोन्याची दागिणे असलेला एक बॉक्स गायब केला.असे या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या सोबत दोन मुले देखील होती.ही केवळ चोरी नाही, तर सराफा बाजारांमधील एक सुरू असणारा नवीन ट्रेंड आहे. यामध्ये लक्ष विचलित करण्यासाठी आणि सोने चोरण्यासाठी स्त्रिया आणि लहान मुलांचा वापर करातात.
फवारा चौक में सर्राफा व्यवसाय लक्ष्मण जुगल अग्रवाल जी के यहां से सोने के पेंडल का डिब्बा लगभग वजन 280 ग्राम इन महिलाओं ने चोरी की इनके साथ में दो लड़के थे एक मोटरसाइकिल पर और एक पैदल था । https://t.co/AzJhic4VtP — Manoj Agrawal 🇮🇳 (@Manoj_Indore) October 27, 2026
या व्हिडिओ मध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेल्या बाईकडे बघा, या दोन धूर्त स्त्रिया अंगठी खरेदी करण्यासाठी सोन्याचे व्यापारी लक्ष्मण जुगल अग्रवाल यांच्या दुकानात आल्या सोन्याचे व्यापरी दुकानातील सामान बाहेर काढायला आणि मागे वळताच, त्या बाईने चतुराईने सोने चोरले याचा थक्क करणारा व्हिडिओ cctv मध्ये कैद झाला आहे. या घटनेच्या cctv फुटेजचीही चर्चा सोशल मिडियावर होत आहे. मात्र, ज्या शहरात ही घटना घडली त्या शहराकडून अधिकृत पुष्टी आणि या चोरीच्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच दुकानदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
या चोरीच्या घटनेत महिलांनी फवारा चौकातील सराफा व्यापारी लक्ष्मण जुगल अग्रवाल यांच्या दुकानातून सुमारे २८० ग्रॅम वजनाचा सोन्याच्या पेंडंटचा एक बॉक्स चोरला असल्याचे सांगितले जाते.त्यांच्यासोबत दोन मुले होती, एक मोटारसायकल स्वार सुद्धा सहभागी होता असे सांगण्यात येते.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.
Hyderabad Theft : हैदराबाद मध्ये भरदिवसा महिंद्रा थारचे स्पेअर टायर चोरीला; CCTV व्हिडिओ व्हायरल