
Bull Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
चिखलामध्ये गाडी अडकल्यावर तिला पुढे ढकल्याला किमान 2-4 माणसे लागतात. पण खधी बैलाला धक्का देत असल्याचं तूम्ही पाहिलं आहे का? सध्या एक व्हिडिओ सोशलमीडियावर तूफान व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहून सगळ्याचे डोळे मोठे झाले. Bull Viral Video:
एक कार पूर्णपणे चिखलात रुतली आहे. तिची चारही चाक अर्धी चिखलात केली. त्यामुळे कितीही रेस दिली तरी सुद्धा गाडी जरापण हालत नाही. तेवढ्यात मागून एक बैल येतो आणि कारला डोक्याच्या साहय्याने चारचाकीला धक्का मारतो. हे पाहायला थोडं वेगळं वाटेल,परंतू मोबाईलमध्ये शूट करून टाकलं.
एकाने लिहिलं, “प्राण्यांमध्ये पण माणुसकी आहे.” दुसरा म्हणाला, “हा बैल तर खरा हिरो आहे.” बऱ्याच जणांनी तर असं पण लिहिलं की माणसं मदत करत नाहीत, पण प्राणी आपल्याला मदत करतात. कदाचित त्याला ती गाडी विचित्र वाटली असेल, नवीन वस्तू पाहून त्याला उत्सुकता वाटली असेल. किंवा त्याला वास आला असेल. किंवा त्याला वाटलं असेल की ही वस्तू आपल्या रस्त्यात आहे, तिला बाजूला करूया. त्यामुळे तो थेट मदतीच्या भावनेने आला असं म्हणणं थोडं कठीण आहे. त्याच्या मनात काय होतं हे फक्त तोच जाणे.
व्हिडीओत सगळ्यात मोठा सस्पेन्स हाच आहे. बैलाने धक्का दिल्यावर गाडी बाहेर आली का? कारण व्हिडीओ अर्ध्यातच संपतो. गाडी चिखलातून निघाली की नाही, याबद्दल काहीच माहिती मिळत नाही. हा व्हिडीओ कुठे शूट झाला, केव्हाचा आहे, हे पण समजलेलं नाही.तरी पण एक गोष्ट खरी आहे की असा प्रसंग रोज घडत नाही. रस्त्यावर बैल दिसणं कॉमन आहे, पण बैलाने गाडीला धक्का देणं हे कधीच पाहायला मिळत नाही. म्हणूनच हा व्हिडीओ लोकांना एवढा आवडतोय.
Viral Video: फुटपाथवर बाईक चालवण्याचा माज उतरवला! तीन तरुणांनी बायकर्सना शिकवला नागरी शिस्तीचा धडा
अशा प्रकारचे प्राण्यांचे व्हिडीओ नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेतात. श्वान माणसांच्या लहान बाळाला वाचवतो, तर माकड माणसाची कॉपी करतो. आता या यादीत बैल सुद्धा सहभागी होतो. शेवटी एवढंच म्हणता येईल की प्राणी कधी काय करतील याचा नेम नाही. त्यांचं वागणं कधी कधी आपल्यापेक्षा जास्त समजूतदार वाटतं.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.
Ans: चिखलात अडकलेल्या कारला एक बैल डोक्याने धक्का देताना दिसतो.
Ans: कारची चारही चाके चिखलात रुतल्यामुळे ती पुढे सरकत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
Ans: व्हिडीओ कुठे आणि केव्हा चित्रित करण्यात आला, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही.