Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदूतासारखा आला…! लाटांशी झुंज देत १६ वर्षीय मुलाने १० वर्षांच्या चिमुकल्याचा वाचवला जीव, थरारक Video Viral

Video Viral : तो आला आणि त्याने मृत्यूच्या दाढीतून वाचवला चिमुकल्याचा जीव. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एरिक ट्रम्प यांनी व्हिडिओ शेअर करत तरुणाच्या हिमतीचे काैतुक केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2026 | 09:03 AM
देवदूतासारखा आला...! लाटांशी झुंज देत १६ वर्षीय मुलाने १० वर्षांच्या चिमुकल्याचा वाचवला जीव, थरारक Video Viral

देवदूतासारखा आला...! लाटांशी झुंज देत १६ वर्षीय मुलाने १० वर्षांच्या चिमुकल्याचा वाचवला जीव, थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
  • एका किशोराच्या प्रसंगावधान आणि धाडसाचे सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.
  • या घटनेनंतर प्रशिक्षित बचावकार्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सोशल मिडियावर एक व्हिडिओ अलिकडे खूप जास्त व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ अमेरिकेती कॅलिफोर्निया येथील असून यात एका १६ वर्षांच्या मुलाने १० वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवल्याचे दिसून आले. समुद्राच्या पाण्यात लहान मुलगा बुडून जात असतानाच १६ वर्षांचा तरुण त्याच्या बचावासाठी धाव घेतो आणि एका देवदूताप्रमाणे त्याचे प्राण वाचवतो. ही घटना एकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर आता चांगलाच व्हायरल होत आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

फादर ऑफ द इयर! पावसापासून मुलाचे संरक्षण करण्यासाठी वडिलांनी घेतली पॉलीथिन बॅगची मदत; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

ही घटना कॅलिफोर्नियातील सांताक्रूझ येथील सीब्राइट समुद्रकिनाऱ्यावर घडून आली. शनिवारी समुद्राच्या लहरी अचानक तीव्र वेगात वाहू लागल्याने १० वर्षांचा चिमुकला या लहारींमध्ये वाईटरित्या अडकला. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की त्याला यातून स्वत:ला वाचवता येत नव्हते. या कठीण परिस्थितीत अखेर एक १६ वर्षांचा तरुण मदतीसाठी धावून आला आणि त्याने मुलाला खेचत पाण्यातून दूर समुद्रिकिनाऱ्यावर आणले. व्हिडिओमध्ये मुलाला वाचवण्यासाठी तरुणाची धडपड स्पष्ट दिसून येते.

माहितीनुसार, हा तरुण एक लाईॉफगार्ड असून त्याच्या प्रसंगावधानाने अनेकांचे हृदय जिंकले आहे. घटनेवेळी उपस्थित असलेले काही जण मुलाला वाचवण्यासाठी समुद्रात जाऊ पाहत होते पण लाईफगार्डने त्यांची समजूत काढली. जर तुम्ही यासाठी ट्रेनिंग घेतली नसेल आणि तुम्ही अप्रशिक्षित असाल तर अशा परिस्थितीत समुद्रात जाऊन तुम्ही स्वत:चाही जीव गमवाल असा सल्ला त्याने उपस्थितांना दिला. यानंतर रेस्क्यूची जबाबदारी स्वत:वर घेऊन तो समुद्रात उतरला आणि सुरक्षितपणे मुलाला पाण्यातून बाहेर काढले.

Give this 16-year-old lifeguard the highest civilian honor. This is truly the best of America! Well done! pic.twitter.com/Pq99xNK6WI — Eric Trump (@EricTrump) July 27, 2026

आईसाठी मुलाचा अनोखा चमत्कार, कचऱ्यापासून घरकामासाठी तयार केले रोबोट; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एरिक ट्रम्पसह अनेक बड्या लोकांनी घटनेचे दृष्य सोशल मिडियावर शेअर करत तरुणाच्या धाडसाचे काैतुक केले आहे. व्हिडिओ @EricTrump यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘या १६ वर्षीय जीवरक्षकाला सर्वोच्च नागरी सन्मान द्या. हे खऱ्या अर्थाने अमेरिकेचे सर्वोत्तम रूप आहे! शाब्बास!’ व्हिडिओला २३ मिलियनहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हे कुठे घडलं? हा खरा नायक आहे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती भीतीदायक! इतर कोणीही त्याला मदत का करत नव्हतं?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तेच तर त्याचं काम आहे. त्याच गोष्टीसाठी त्याला प्रशिक्षण देण्यात आलं होतं. सुदैवाने तो तिथे होता आणि त्याला योग्य प्रशिक्षण मिळालं होतं; पण हे त्याचं कामच आहे”.

 

Web Title: California teen lifeguard saves 10 year old boy from strong ocean waves viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Rescue team
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.