Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधी नव्हे ते आता घडलं! समुद्रात चालताना दिसला वाळवंटाचा जहाज, दृष्य इतके अद्भूत की Viral Video ने क्षणात वेधले यूजर्सचे मन

Beautiful Video : तुम्ही आजवर उंटाला वाळवंटी भागात विहार करताना पाहिले असेल पण समुद्रात पोहणाऱ्या उंटाला तुम्ही कधी पाहिले आहे का? हे दुर्मिळ आणि सुंदर दृष्य अलिकडेच सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 11, 2026 | 10:20 AM
कधी नव्हे ते आता घडलं! समुद्रात चालताना दिसला वाळवंटाचा जहाज, दृष्य इतके अद्भूत की Viral Video ने क्षणात वेधले यूजर्सचे मन

कधी नव्हे ते आता घडलं! समुद्रात चालताना दिसला वाळवंटाचा जहाज, दृष्य इतके अद्भूत की Viral Video ने क्षणात वेधले यूजर्सचे मन

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एक अनोखे आणि मनमोहक नैसर्गिक दृश्य वेगाने व्हायरल होत आहे.
  • या व्हिडिओत काही अप्रत्याशित आणि दुर्मिळ क्षण पाहायला मिळतात.
  • या दृश्याने यूजर्सना आश्चर्यचकित करत मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळवल्या आहेत.
कधीकधी निसर्ग आपल्याला असे काही दृष्य दाखवतो ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. सोशल मिडियावर असे अनेक व्हिडिओज शेअर केले जातात जे क्षणातच आपले लक्ष वेधून घेतात. आताही अलिकडे असाच एक सुदंर व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाला आहे ज्यात संयुक्त अरब अमिरातीमधील उम्म अल कुवैनच्या समुद्रात वाळवंटाचा जहाज मानला जाणारा उंट पाण्यातून चालताना दिसला. मुख्य म्हणजे हा एकच उंट नसून पाण्यात यावेळी असंख्य उंटाचा ताफा दिसून आला ज्यांना पाहताच लोक थक्क झाली. उंट हा प्राणी साधारण वाळवंटी प्रदेशात आढळून येतो, अशात ज्या प्राण्याने कधी समुद्र पाहिलाच नाही त्याच्या संपूर्ण ताफ्याने असे समुद्रात चालत जाणे अनेकांना आश्चर्यचकित करणारे ठरले. चला व्हिडिओत काय दिसलं याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सेल्फी घेणं जीवावर बेतलं! एकीला वाचवायला गेली अन् धबधब्यात बुडून तीन तरुणींचा मृत्यू; घटनेचा लाईव्ह Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये आपल्याला निळाशार, शांत आणि सुंदर असा समुद्र दिसून येतो. पण व्हिडिओतील खास गोष्ट त्या समुद्रात उंटाला पाहणे ही होती. वाळवंटात दिसणारा उंट आता चक्क समुद्राच्या पाण्यातही उतरला आहे हे पाहून यूजर्स चांगलेच खुश झाले. हे दृष्य कंटेंट क्रिएटर नोरा अल शम्सीने आपल्या कॅमेरात कैद केले. तिने सांगितले की, हे दृष्य पाहणे तिच्यासाठी एक अनपेक्षित घटना होती. त्या परिसरात ती फिरायला गेली होती आणि याचवेळी अचानक तिला उंटांचा एक मोठा ग्रुप समुद्राच्या पाण्यातून जाताना दिसला. हे दुर्मिळ दृष्य पाहून ती थक्क झाली आणि तिने लगेच याचा व्हिडिओ आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला. तिचा विश्वास आहे की, अशा क्षणांमुळे आपल्याला आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक सौंदर्याची झलक मिळते, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. व्हिडिओ इंटरनेटवर शेअर होताच यावर कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. कधीही न पाहिलेले हे असे दृष्य खरोखर घडून आले की बनावटी आहे हे जाणून घेण्यासाठी लोक अधिक आतुर झाली.

बॉयफ्रेंडला रंगेहात पकडताच गर्लफ्रेंडचा पारा चढला, भररस्त्यातच जोडीदाराला दिला धोबीपछाड; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @nawari_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘निसर्गात असे दृश्य पाहायला मिळेल, अशी तुम्हाला कधी अपेक्षा होती का?’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “खूपच छान”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हेच ते जग आहे ज्याचे रक्षण करणे आपल्याला गरजेचे आहे—किती जादुई आणि उत्साहवर्धक! यासाठी धन्यवाद…” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “श्वास रोखून धरणारे, कल्पनेच्याही पलीकडचे. अप्रतिम काम, सुंदर!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Camels walking in the sea stunning video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral
1

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral
2

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास
3

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral
4

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.