Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वप्नवतंच जणू! आकाशातून झाला पैशांचा पाऊस, पतीसोबतच्या भांडणात महिलेने बाल्कनीतून फेकले 1,51,00,000 रुपये; Video Viral

Money Rain : पाण्याचा पाऊस तर आपण पाहिला आहे पण तुम्ही कधी पैशांचा पाऊस पाहिला आहे का? ही घटना सत्यात घडून आली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. यात पैसे वेचण्यासाठी लोकांची धावपळ दिसून आली.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 17, 2026 | 09:10 AM
स्वप्नवतंच जणू! आकाशातून झाला पैशांचा पाऊस, पतीसोबतच्या भांडणात महिलेने बाल्कनीतून फेकले 1,51,00,000 रुपये; Video Viral

स्वप्नवतंच जणू! आकाशातून झाला पैशांचा पाऊस, पतीसोबतच्या भांडणात महिलेने बाल्कनीतून फेकले 1,51,00,000 रुपये; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • चीनमध्ये एका महिलेने रागाच्या भरात बाल्कनीतून मोठ्या रकमेच्या नोटा खाली फेकल्या.
  • नोटा पडताच लोकांनी त्या वेचण्यासाठी गर्दी केली आणि गोंधळ उडाला.
  • परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
पैशांचा पाऊस पडावा अशी इच्छा तर प्रत्येकाच्या मनात असते पण सत्यात ते घडून येणार नाही हेही आपल्याला माहिती असते. पण थांबा, कारण तुम्हाला स्वप्नवत वाटणारी ही घटना आता सत्यात घडून आली आहे. होय, चीनमधील ग्वांगडोंगमध्ये एका सोसयटीत खऱ्या पैशांचा पूर आला ज्यानंतर लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण खरंतर हा पैशांचा पाऊस ढगातून झाला नाही तर एका कुबेराच्या बाल्कनीतून झाला. तर झालं असं की, एका श्रीमंत महिलेचे आपल्या नवऱ्यासोबत जोरदार भांडण झाले होते. यानंतर नवऱ्यावरचा राग काढण्यासाठी ती एक मोठे पाऊल उचलले आणि जवळपास १.५ कोटी रुपयांच्या नोटा तिने बाल्कनीतून खाली फेकून दिल्या.

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral

आता विचार करा, नोटांचा पाऊस होतोय, नोटा आकाशातून खाली पडतायेत मग लोक कशाला थांबतील. शेजाऱ्यांनी आणि खाली उभ्या असलेल्या लोकांनी लगेच महिलेने बाल्कनीतून फेकलेले हे पैसे वेचण्यास सुरुवात केली. फुकटचे पैसे मिळवण्यासाठी लोकांमध्ये गर्दी निर्माण झाली आणि प्रत्येकाने संधीचा फायदा घेत आपले खिसे भरुन घेतले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की पुढे पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. प्राथमिक तपासात असे उघड झाले की, हा केवळ एक बनाव नव्हता; कौटुंबिक समस्या किंवा आजाराबद्दल ऐकल्यानंतर ती महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. दुःखाच्या या क्षणी, तिने हा “अनोखा” मार्ग निवडला होता.

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्राॅपर्टी मॅनेजमेंटने पुष्टी केली की उडवलेल्या या नोटा खोट्या नसून त्या खऱ्या नोटा होत्या. दरम्यान स्थानिक पोलिसांनी आता लोकांना त्यांनी वेचलेले हे पैसे परत करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचा व्हिडिओ मात्र आता जगभरात मोठ्या वेगाने शेअर केला जात आहे. व्हिडिओ @dailymail नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “अशा गोष्टी माझ्यासोबत कधीच का घडत नाहीत?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जो कोणी पैसे फेकून देईल, त्याला मी काहीच परत देणार नाही.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती त्याला त्याचे पैसे साफ करायला मदत करत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: China money rain viral video woman throws cash from balcony guangdong viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • China
  • MONEY
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
1

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

Satwik-Chirag चा दमदार ‘स्मॅश’! China Masters मध्ये भारतीय जोडीची विजयी घोडदौड; मलेशियाला धूळ चारत फायनलमध्ये धडक
2

Satwik-Chirag चा दमदार ‘स्मॅश’! China Masters मध्ये भारतीय जोडीची विजयी घोडदौड; मलेशियाला धूळ चारत फायनलमध्ये धडक

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान
3

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
4

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.