(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडीओमध्ये रामलीलेच्या मंचावर कलाकारांचा सराव सुरू असल्याचे दिसते. यावेळी रावणाची भूमिका करणारा कलाकार आपल्या भारदस्त आवाजात संवाद सादर करत असतो. मात्र, अचानक समोरून एक चप्पल उडत येते आणि थेट त्याला लागते. या अनपेक्षित प्रकारामुळे मंचावरील वातावरण क्षणात बदलते. चप्पल लागल्यानंतर रावणाची भूमिका करणारा कलाकार संतापतो. तो आपले संवाद बाजूला ठेवून चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीला जाब विचारू लागतो. इतकेच नव्हे, तर मंचावर सैनिकांची भूमिका करणाऱ्या इतर कलाकारांनाही संबंधित व्यक्तीला पकडून आणण्यास सांगतो. त्यामुळे रामलीलेतील प्रसंगाला अचानक वेगळे वळण मिळते.
दरम्यान, चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीने आपण केवळ गंमत म्हणून असे केल्याचे सांगितल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. मात्र, यामुळे रावणाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा राग आणखी वाढतो. ‘आम्ही रावण आहोत, कुणी रस्त्यावरचे चोर नाही,’ अशा शब्दांत तो आपली नाराजी व्यक्त करतो. हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सने व्हिडिओची मजा लुटली आहे. ‘रावण भाऊ अगदी बरोबर बोलत आहेत,’ अशा मिश्किल प्रतिक्रियाही यूजर्सने व्हिडिओला दिल्या आहेत. दरम्यान हा व्हिडिओ @Brijeshyadav38 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ३० हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
किसी ने रावण को चप्पल मार दिया.. किसने किया ये दुसाहस?🤔 https://t.co/cruMTSKCnz — Brijesh Kumar Yadav (@Brijeshyadav38) October 17, 2026
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






